आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मिळणत असलेल्या १५०० रुपयांच्या मदतीतील वाढीसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे भाष्य केले आहे.
अडीच कोटी बहिणींना न्याय दिल्याबरोबर तुम्ही पत्रकारबंधूसुद्धा... -"लाडक्या बहीण" योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला आहे, त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांना कसरत करावी लागेल? असा प्रश्न विचारला असता मुनगंटीवार म्हणाले, "आपण पत्रकार म्हणूनही कारण नसताना साधारणपणे अडीच कोटी महिलांचा, असा अवमान का करता माहीत नाही. आम्ही दर वर्ष निवृत्ती वेतन आणि पगारावर ३० हजार कोटींच्या जवळपास वाढ करतो. तुमच्या पैकी कुणीही त्यावर काही बोलत नाही. अडीच कोटी बहिणींना न्याय दिल्याबरोबर तुम्ही पत्रकारबंधूसुद्धा खडखडाट झाला खडखडाट झाला, असे म्हणता." मुनगंटीवार एबीपी माझा सोबत बोलत होते.
राज्यकर्ते म्हणून आपल्याला सामाजिक न्याय देताना खडखडाट दिसतो. कर्मचाऱ्यांना जेव्हा आम्ही वर्षाला ३०-३० हजार कोटी रुपये वाढवतो, तेव्हा तुम्ही एक शब्द बोलत नाही आश्चर्य आहे.
सर्व प्रश्न जर एकाच बजेटमध्ये सोडवले तर, मग... -आज असे मानायचे का की, घोषणा केल्याप्रमाणे, १५०० रुपयांवरून २१०० रुपये होतील? असा प्रश्न केला असता मुनगंटीवार म्हणाले, "तो पाच वर्षांचा टाईमटेबल आहे. असे काहे की जाहीरनाम्यातील काही मुद्दे आत्ताच सोडवायला हवेत. प्रत्येक मुद्दा, सर्व प्रश्न जर एकाच बजेटमध्ये सोडवले तर, मग निवडणुकाच घ्यायची आवश्यकता राहणार नाही. टप्प्या टप्प्याने प्रश्न सोडवायचे असतात, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.