शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:27 IST

टाळेबंदीमुळे अनुदान रखडले; कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ; ग्रंथालये सुरू करण्याची होतेय मागणी 

- स्वप्नील कुलकर्णी मुंबई : शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालय प्रणाली सरकारने विकसित केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ देवघेवीतून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे कारण देत राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये ३१ आॅगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले पाच महिने वाचनालये बंद आहेत, त्यातच मागील वर्षाचे अनुदान मंजूर होऊनही रखडल्याने राज्यातील एकवीस हजारांहून अधिक कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांना दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यात सध्या बारा हजार १४९ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यामध्ये एकवीस हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाने नेमून दिलेल्या अ, ब, क, ड अशा वर्गवारीनुसार या अनुदानाचे वितरण होत असते. यामध्ये जुलै-आॅगस्ट महिन्यात अनुदानाचा पहिला टप्पा दिला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिरा म्हणजेच जुलै महिन्यात अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला असला तरी शासनाने सर्वच विभागात खर्चावर नियंत्रण आणल्यामुळे अनेक ग्रंथालयांना अनुदानाचा दुसरा टप्पा मंजूर होऊनही अद्याप मिळाला नाही. त्यामुळे ग्रंथालयाचा इतर खर्च तसेच कर्मचाºयांचे वेतन कसे द्यायचे, हा प्रश्न आहे. एकूणच ग्रंथालयांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून ग्रंथालये सुरू करायला हवीत, तरच ‘गाव तिथे वाचनालय’ या संकल्पनेला संजीवनी मिळेल.ग्रंथालयाचा वर्ग मिळणारे अनुदानजिल्हा - अ ७,२०,०००तालुका - अ ३,८४,०००इतर - अ २,८८,०००जिल्हा - ब ३,८४,०००तालुका - ब २,८८,०००इतर - ब १,९२,०००तालुका - क १,४४,०००इतर - क ९६,०००ड वर्ग ३०,०००विभाग सार्वजनिक वाचनालयेअमरावती २०४१औरंगाबाद ४२६९नागपूर ११०८नाशिक १६७०पुणे ३१४५मुंबई ६२२कोरोनामुळे गेली ४-५ महिने सार्वजनिक ग्रंथालये बंद आहेत. येथे काम करणारा कर्मचारी तुटपुंज्या वेतनात काम करतो. त्याला इतर सुविधा उपलब्ध नसतात. या सर्वांचा विचार करून शासनाने त्यांना किमान वेतन श्रेणी लागू करावी. ग्रंथालयांची आर्थिक घडी बसण्यासाठी ती पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना उपलब्ध करून द्यायला हवी.- नंदू बनसोड, कार्यवाह,सार्वजनिक वाचनालय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य