शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 01:17 IST

माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणी नियोजित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबतच्या माहितीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कोकाटे यांच्यावर शुक्रवारी मुंबईतील रुग्णालयात महत्त्वाची 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतरच त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही, याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. डॉक्टरांच्या हिरव्या कंदिलाशिवाय कोकाटे यांना ताब्यात घेता येणार नसल्याने नाशिक पोलिसांचे एक पथक रात्रभर रुग्णालयातच तळ ठोकून आहे.

नेमकी काय आहे परिस्थिती?

माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणी नियोजित आहे. या चाचणीचा अहवाल काय येतो, यावर कोकाटे यांचे पुढील पाऊल अवलंबून असेल. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून कोकाटे यांना डिस्चार्ज मिळत नाही, तोपर्यंत त्यांना कायदेशीररित्या ताब्यात घेता येणार नाही. त्यामुळे आता डॉक्टरांच्या मेडिकल रिपोर्टची वाट बघावी लागणार आहे.

रुग्णालयात पोलिसांचा पहारा

कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हे पथक रुग्णालयात दाखल झाले असून, कोकाटे यांच्यावर निगराणी ठेवली जात आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यास तातडीने पुढील कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस कोकाटे यांच्यासाठी आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पोलिसांनी लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच आतापर्यंत कोकाटे यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती नोंदवून घेतली आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही जबाब नोंदविला आहे. उद्या शुक्रवारी कोकाटे यांची अँजोग्राफी करण्यात येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर डिस्चार्जबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. डिस्चार्ज जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत त्यांना पोलिसांना ताब्यात घेता येत नाही. पोलिसांचे पथक मुंबईत मुक्कामी थांबलेले आहेत. कारवाई पुर्ण करून उद्या पथक नाशिकला परतणार, अशी  माहिती पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : When will Manikrao Kokate be discharged? Nashik police deployed.

Web Summary : NCP MLA Manikrao Kokate's discharge depends on angioplasty report. Nashik police are stationed at the Mumbai hospital awaiting his discharge to proceed with legal action. The medical report and subsequent police action are crucial.
टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेस