शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:47 IST

Deputy CM Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेत तुम्ही घातला खोडा, लाडक्या बहि‍णींनी तुम्हाला दाखवला जोडा, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

Deputy CM Eknath Shinde: पुढील निवडणुकीतही लाडक्या बहिणी तुम्हाला जागा दाखवतील. इतिहास काढून सांगा की, किती वर्ष काँग्रेसचे सरकार होते, अशी योजना कधी सुरू केली का? त्याला हिंमत लागते, धाडस लागते, लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते, ती दानत आम्ही दाखवली. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललो, ते पूर्ण करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढायला हवी, ती कमी कशी होते, याचा अर्थ फ्रॉड झाला आहे, गडबड झाली आहे, भ्रष्टाचार झाला आहे, चुका झाल्या आहेत, राजकारणासाठी, मतांसाठी, महाराष्ट्र राज्य लुटण्याचे तुम्ही काम केले. तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो, या शब्दांत ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

न्यायालयानेही चपराक देत परत पाठवले

लाडकी बहीण योजनेवरील लक्षवेधी संदर्भात अदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिले आहे. ही योजना सुरू केली, तुम्ही न्यायालयात गेलात. अनिल वडपल्लीवार कोणाचा समर्थक होता. तो नाना पटोले यांचा समर्थक होता. ही योजना घोषित झाल्यापासून तुम्ही टीका करत आहात आणि आता लाडक्या बहि‍णींवर अन्याय झाल्याच्या बाता करत आहात. योजना बंद होण्यासाठी न्यायालयात गेले, पण न्यायालयानेही त्यांना चपराक देत परत पाठवले. ही योजना फसवी आहे, चुनावी जुमला असल्याचा दावा तुम्ही केला. आचारसंहिता लागल्यावर पैसे कसे देणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर आम्ही या योजनेचे आगाऊ पैसे दिले. जरा सत्य ऐका, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला. 

योग्य वेळ आली की, आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते सगळे पूर्ण करणार

आम्ही चांगल्या भावनेतून आणि भूमिकेतून लाडकी बहीण योजना सुरू केली. आम्ही डोके लावून काम केले. लाडक्या बहि‍णींनी तुमचा टांगा पलटी केला. असे लँडस्लाइड मँडेट दिले की, सगळ्यांनी पाहिले. लाडकी बहीण योजना कमी होईल, बंद होईल, असे दावे केले जात आहेत, तरी मी तुम्हाला सांगतो की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्ही २१०० रुपयांचा मुद्दा काढलात, योग्य वेळ आली की, आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते सगळे पूर्ण करणार. लाडकी बहीण योजनेत तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहि‍णींनी तुम्हाला जोडा दाखवला, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : When will beloved sisters receive ₹2100? Shinde's big announcement

Web Summary : Deputy CM Shinde assured the 'Ladki Bahin' scheme will continue. He countered opposition claims of fraud and corruption, promising all assurances will be fulfilled at the right time. He criticized attempts to obstruct the scheme, stating beneficiaries showed opponents their place.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती