शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्ट प्रकल्प कधी येणार जमिनीवर? यंत्रणांतील समन्वयाचा अभाव ठरतोय अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 03:29 IST

ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील बंदर. ज्याप्रमाणे सागरी तटांवर मालाची ने-आण आणि चढ-उतार करण्यासाठी बंदर असते, त्याच धर्तीवर भारतात प्रथमच ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची होती.

संजय देशमुख -

जालना : देशातील पहिले ड्रायपोर्ट जालना आणि वर्धा येथे प्रस्तावित केलेले होते. त्यापैकी जालन्यातील ड्रायपोर्टचे काम प्रारंभी अत्यंत गतीने सुरू झाले होते; परंतु आता पाच वर्षांनंतरही प्रत्यक्षात उद्दिष्टापर्यंत न पोहोचल्याने सध्या या प्रकल्पाची गत बिरबलाच्या खिचडीप्रमाणे झाली आहे. यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव हेदेखील त्यामागचे एक कारण आहे.

जालन्याजवळील दरेगाव येथे ड्रायपोर्टचे काम सुरू केले गेले. त्यासाठी चारशे एकर जागा संपादित करून तेथे सुरक्षा भिंत बांधणे, ड्रायपोर्टपासून जवळच असलेल्या दिनेगाव रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेरूळ अंथरणे, जालना ते औरंगाबाद मार्गावरून ड्रायपोर्टसाठी मुख्य चौपदरी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. 

ड्रायपोर्टचे महत्त्व काय?ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील बंदर. ज्याप्रमाणे सागरी तटांवर मालाची ने-आण आणि चढ-उतार करण्यासाठी बंदर असते, त्याच धर्तीवर भारतात प्रथमच ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची होती. त्यांनी जालना आणि विदर्भातील वर्धा येथे ड्रायपोर्टची उभारणी प्रस्तावित केली होती. जेएनपीटीच्या बंदरांमध्ये कस्टम क्लीअरन्ससाठी लागणारा वेळ वाचून गतीने माल हव्या त्या देशात निर्यात करता येणे शक्य व्हावे, हा या ड्रायपोर्टचा उद्देश आहे. लॉजिस्टिक उद्योगांना चालना मिळणार आहे. भविष्यात जेएनपीटी जालना ते मनमाड ही स्वतंत्र रेल्वेलाइन प्रस्तावित असून त्यामुळे मालाची ने-आण गतीने आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत खूप स्वस्त होणार आहे.

कामांची कासवगती  वर्धा येथील तुलनेत जालन्यातील काम बरेच प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. मध्यंतरी जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी देखील आढावा घेतला होता; परंतु नंतर ज्या गतीने ही कामे होणे अपेक्षित होते, ती होत नसल्याचे वास्तव आहे.  

जालन्यातील ड्रायपोर्टचा प्रकल्प प्रत्यक्षात आयात-निर्यातीसाठी सुरू व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीने आपण जेएनपीटीच्या संपर्कात असून, केंद्रातही या संदर्भात पाठपुरावा करत आहोत. हा प्रकल्प येत्या सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

ड्रायपोर्टच्या उभारणीत पूर्वीपासून सक्रिय आहोत. मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी, संचालक विवेक देशपांडे, अर्जुन गेही, असे आम्ही पाठपुरावा करत आहोत. प्रकल्पाचा मराठवाडा, खान्देश आणि अन्य जिल्ह्यातील निर्यातदारांना मोठा लाभ होणार आहे.   - राम भोगले, उद्योजक 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकार