शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

खिशात पैसे नसताना ‘शिवस्मारकाचा’ घाट कशाला

By admin | Updated: January 8, 2017 21:54 IST

शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, अशी कानउघडणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 : राज्यात असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यास सरकार असमर्थ ठरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा घाट म्हणजे खिशात पैसे नसताना घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, अशी कानउघडणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.

जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (ट्रस्ट) तर्फे दादर येथील शिवाजी मंदिर येथे दोन दिवसीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाच्या सांगता सोहळ््यात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शिवस्मारकाविषयी राज म्हणाले की, अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या शिल्पाला समोर ठेवून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. परंतु समुद्रात हे शिल्प उभारण्यापूर्वी शिल्प म्हणजे काय? याची माहिती आहे का? उभारलेल्या पुतळ््यांवरुन गल्लोगल्ली होणारे राजकारण कमी आहे का ? त्यात आणखी नवा पुतळा समुद्रात उभारायचा कशाला़? शिवाजी महाराजांबद्दल इतकाच आदर असेल तर त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कोण? हे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना इतिहास भुगोलाच्या माध्यमातून शिकवा. तरच तो अधिक बिंबेल आणि असे पुतळे उभारण्याची गरज भासणार नाही.

नोटाबंदीवर टिका करताना ते म्हणाले की, ८ नोव्हेंबर रोजी ज्या आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. आणि हे मी म्हणत नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे.

बुलेट ट्रेन विषयी ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या योेजनेत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश आहे; ती कशाला? यामागे स्वतंत्र मुंबई करण्याचे मोदी यांचे षडयंत्र आहे. कारण मुंबई-दिल्ली अशी विमान फेऱ्यांना अधिक मागणी असताना मुंबई-अहमदाबाद हा मार्ग कशाला? विशेष म्हणजे या प्रवासात राज्यासाठी केवळ चारच थांबे आहेत. त्यामुळे हे षडयंत्र ओळखा, असा टोलाही त्यांनी लगावला. राज यांनी यावेळी त्यांच्या व्यंगचित्राचा प्रवास उलगडला. पाश्चिमात्य कलांविषयी ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात कलेचा कदर केला जातो. ती आपल्या देशात हवी तशी केली जात नाही. जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये सहलीसाठी आलेली किती मुले तेथील चित्रे पाहतात? हा प्रश्न आहे. कारण दिलेल्या वेळेत मुलांना जहांगीर आर्ट गॅलरी दाखवली जाते. तेथे मांडलेली चित्रे नाही. त्यामुळे कलेची बीजे मुलांमध्ये रुजणार कशी? उदाहरणादाखल ते म्हणाले की, २६ जुलै २००५ च्या मुंबईच्या पावसात चित्रकार माधवराव सातवळेकर यांनी काढलेल्या चित्रांचा अक्षरश: चिखल झाला. त्यांच्या या अमूल्य चित्रांसाठी सरकार पुढे सरसावले नाही. ही खंत आहे. त्यामुळेच कलेची कदर भारतात इतर देशांच्या तुलनेत होत नाही.कला टिकविण्यासाठी इतिहासाचे जतन करणे आवश्यक आहे. ते केले जात नाही. त्याला कारणीभूत शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे शिक्षणपद्धतीची तर बोंबच आहे. येणारा प्रत्येक नवा शिक्षणंमंत्री आपल्याप्रमाणे शिक्षणाविषयीचे धोरण ठरवतो. परंतु शिक्षणपद्धतीत सुधारणा झालेली दिसत नाही. उलट मुलांसमोर काय करावे हा प्रश्न कायमच असतो. शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून अभ्यासक्रम हा एकत्रित विचार करुन तयार केला पाहिजे. म्हणजे आता होणारा गोंधळ टाळता येईल. दप्तरांच्या ओझ्यावर टीका करताना ते म्हणाले की, दप्तरांचे ओझे म्हणजे काय? हे नेमके कोणाला कळाले नाही. कारण काटे घेऊन केवळ दप्तरांचे वजन मोजण्यापेक्षा पुस्तके कशी कमी करता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.