शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

Video : "मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला नं.१ वर आणलं ; गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आली!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 19:28 IST

माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाली आहे : देवेंद्र फडणवीस

पुणे : भाजप सरकारच्या काळात गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आली. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाली आहे. महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर आणले असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडी सरकारवर देखील टीकास्त्र सोडले.

फडणवीस पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते.  पण सध्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असून जुन्या कामांना स्थगिती देणे एवढेच काम या सरकारला उरले आहे.

विजबिलांबाबत सरकारने घुमजाव केले आहे. या सरकारची एक वर्षात एकही उपलब्धी नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीग्रस्ताना जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. पंचनामेही अर्धवट आहेत. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. बैठकांना बोलावण्यात आले नाही. विरोधकांनी केलेल्या सूचननेवर कारवाई केली जात नाही असेही फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांना टोला.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात विरोधक राजकारण करीत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली. त्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल घेतली हे काही कमी नाही. -------एकप्रकारे जयंत पाटलांनी पराभव मान्य केला. भाजपाने बोगस नोंदणी केल्याचे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. ईव्हीएम मशीनवर आरोप करता येत नाही म्हणून 'कव्हर फायरिंग' केले जात आहे. हा आरोप म्हणजे पुणेकर मतदारांवर अविश्वास दाखविण्याचाच प्रकार आहे.

....

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना विविध 'विशेषणां'नी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात टीका होणे आवश्यक आहे. परंतु, राजकारणाचा स्तर ठेवला जायला हवा. आमच्याकडून आम्ही तो स्तर राखूच पण विरोधकांनीही तो राखावा. आमच्याकडून हा विषय संपला असेही फडणवीस म्हणाले. ------सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावलेले नाहीत.... सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. हे अनैसर्गिक सरकार असून ज्या दिवशी ते पडेल; त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 

 

 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेGujaratगुजरात