शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी? १७ मे रोजी फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 09:06 IST

समर्पित आयोगाचा अहवाल जूनपूर्वी येण्याची शक्यता नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपूर्वी घेण्यास असमर्थता व्यक्त करणारा राज्य निवडणूक आयोगाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. या अर्जावर १७ मे रोजी सुनावणी होईल. आयोगाची भूमिका सर्वोच्च न्यायालय मान्य करते की तत्काळ निवडणूक घ्यायला सांगते, याचा फैसला होणार असल्याने १७ तारखेच्या सुनावणीबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

प्रभाग/गण रचना अंतिम करणे, आरक्षण निश्चित करणे, मतदार याद्यांना अंतिम रुप देणे ही सर्व कार्यवाही ३१ जुलैपर्यंत आम्ही पूर्ण करू.  पण त्यानंतर राज्यभरात पावसाचे वातावरण असल्याने निवडणुका घेणे शक्य होणार नाही, अशी भूमिका आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. आता १७ मे रोजी  सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरेल. 

जूनपूर्वी बांठिया आयोगाचा अहवाल येणे अशक्यइतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांचे राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाला राज्य सरकारने दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका आदेशात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, आयोगाने लवकरात लवकर अहवाल दिल्यास तो सर्वोच्च न्यायालयात सादर करून ओबीसींचे आरक्षण टिकवावे, यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. तथापि, जूनपूर्वी आयोगाचा अहवाल येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आयोग अशी घेणार राज्यात जनसुनावणीnसमर्पित आयोग २१ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे.  n२२ मे रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे.n२२ मे रोजीच सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे.  n२५ मे रोजी दुपारी २.३० ते दुपारी ४.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे. n२८ मे  रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथेn२८ मे रोजीच सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३०पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे.

टॅग्स :Electionनिवडणूक