शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

व्हॉटस्अ‍ॅप आता डेस्कटॉपवर

By admin | Updated: January 23, 2015 18:21 IST

तरुणांचं हे लाडकं अ‍ॅप आता कॉम्प्युटरवरसुद्धा वापरता येणार आहे.

अनिल भापकर - औरंगाबादतरुणाईचं लाडकं मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉटस्अ‍ॅपची मालकी मागच्या वर्षापासून फेसबुककडे गेली. तेव्हापासूनच फेसबूक आणि व्हॉटस्अ‍ॅप मिळून काहीतरी मोठा धमाका करणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती. तरुणांचं हे लाडकं अ‍ॅप आता कॉम्प्युटरवरसुद्धा वापरता येणार आहे. व्हॉटस्अ‍ॅप वेब या नावाने ही सेवा असणार आहे. आजघडीला ५०० दशलक्षपेक्षा जास्त यूजर्स व्हॉटस्अ‍ॅपचे जगभरात आहेत आणि दिवसागणिक त्यामध्ये भर पडत आहे.व्हॉटस्अ‍ॅप वेब ही सेवा डेस्कटॉपवर व्हॉटस्अ‍ॅप वापरण्याकरिता सुरू करण्यात आली आहे. मात्र यासाठी सध्यातरी फक्त गुगल क्रोम या इंटरनेट ब्राऊजरवरच ही सेवा वापरता येणार आहे. व्हॉटस्अ‍ॅप वेब हे तुमच्या मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपची प्रतिकृती असेल. म्हणजे एकाचवेळी तुम्ही कॉम्प्युटर आणि मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅप वापरू शकाल. तुम्ही व्हॉटस्अ‍ॅप वेबच्या मदतीने जो संवाद साधाल तो लगेच तुमच्या मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपवर ही दिसेल.व्हॉट्सअ‍ॅप वेब कसे वापराल?व्हॉटस्अ‍ॅप वेब या सेवाचा लाभ घेण्यासाठी सध्यातरी फक्त गुगलक्रोम ब्राऊजरच वापरावे लागेल.तत्पूर्वी तुम्हाला तुमचे मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅप अपडेट करून घ्यावे लागेल. जेणेकरून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकाल. एकदा का लेटेस्ट व्हॉटस्अ‍ॅप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल झाले की त्याच्या सेटिंगमध्ये व्हॉटस्अ‍ॅप वेब नावाचे एक आॅप्शन येईल. गुगलक्रोम चालू केल्यानंतर https//web.whatsapp.com ही साईट ओपन करावी लागेल.https//web.whatsapp.com ओपन होईल तेव्हा त्यावर एक क्यूआर कोडचे चित्र तुम्हाला दिसेल. हे चित्र म्हणजे डेस्कटॉप वर व्हॉटस्अ‍ॅप वर लॉगीन करण्यासाठी पासवर्ड प्रमाणे काम करेल. या क्यूआर कोडला तुमच्या मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपवरील व्हॉटस्अ‍ॅप वेब या आॅप्शनच्या मदतीने स्कॅन करावे लागेल. म्हणजे तुमच्या मोबाईल कॅमेरा या चित्रासमोर धरला की, ते चित्र स्कॅन होईल आणि तुम्ही डेस्कटॉपवर व्हॉटस्अ‍ॅपला लॉगीन व्हाल. आता तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपची प्रतिकृती डेस्कटॉपवर दिसेल. त्यासाठी मात्र तुमच्या मोबाईलवरील नेट चालू हवा.व्हॉट्सअ‍ॅपचा इतिहास च्याहूमध्ये काम करणारे जॅन कोम आणि ब्रायन अ‍ॅक्टन या जोडगोळीने असा विचार केला की, एसएमएस किंवा ए२२२ाएमएस पाठविण्यासाठी जे पैसे लागतात, त्यापासून जर लोकांची सुटका केली तर? आणि त्यांनी त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. च्अखेर २००९ साली त्यांनी व्हॉटस् अ‍ॅप या नावाने असे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले, ज्याचा वापर करून मोफत (होय, मोफतच!) एसएमएस पाठविणे शक्य झाले. म्हणजे फक्त टेक्स्टच नाही तर फोटो, आॅडिओ आणि व्हिडिओसुद्धा मोफत पाठविता येतो. त्यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅप इन्स्टॉल केलेले पाहिजे. व्हॉटस् अ‍ॅपला क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते; कारण अँड्रॉईड, आयफोन, ब्लॅकबेरी, सिम्बेन आणि विंडोज फोन यासह जवळपास सर्व प्लॅटफॉर्मचे व्हॉटस् अ‍ॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.