शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत मजूर होण्यात गैर काय ?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 09:00 IST

कामगारांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे आश्वासन

नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते श्रीमंत मजूर म्हणून माझ्यावर टीका करतात. पण मजुरांनी श्रीमंत व्हायचेच नाही का. माथाडी कामगारांनीही श्रीमंत व्हायचे नाही का, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याविषयी विचारणा केली असता याविषयी ईडीचे अधिकारीच माहिती देतील, असे स्पष्ट केले.  राज्यातील माथाडी कामगार संघटनांमध्ये गुन्हेगारीचा शिरकाव होत आहे. या गुंडगिरीविरोधात आवाज उठविला जाईल. पुण्यामधील मुकादमाच्या हत्येची पाळेमुळे शोधून काढण्यासाठीही पाठपुरावा करणार आहे. कामगारांच्या प्रश्नांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आवाज उठविला जाईल, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये आयोजित  मेळाव्यात दरेकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. माथाडी कामगारांचे प्रश्न हे सरकार सोडविणार नसेल तर विधानसभा व विधानपरिषदेमध्ये ताकदीने आवाज उठविला जाईल. गुंडगिरी मोडीत काढण्यासाठीही पाठपुरावा करु असे ते म्हणाले.खुनाचे धागेदोरे मुंबई, नवी मुंबईपर्यंत पुण्यात माथाडी मुकादम ज्ञानोबा मुजुमुले यांचा १७ मार्चला खून झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. खुनाचे धागेदोरे मुंबई, नवी मुंबईपर्यंत आहेत. या खुनामागील सूत्रधारांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.माजी मंत्री गणेश नाईक, शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही यावेळी कामगारांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले. माथाडी चळवळ टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे  आवाहनही करण्यात आले.  

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकर