शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘काहीही घडलं की फडणवीसांचा राजीनामा मागायचा उद्योग बंद करा आणि…’ भाजपाचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:16 IST

BJP Criticize Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडसह काही ठिकाणी भडकलेल्या हिंसाचारानंतर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यावरून आता भाजपाने सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून सुप्रिया सुळे ह्या सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडसह काही ठिकाणी भडकलेल्या हिंसाचारानंतर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यावरून आता भाजपाने सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली आहे. काहीही घडले, की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरलासुरला पक्ष कसा टिकेल, ते पाहा, असा सल्ला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे. 

या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधताना केशव उपाध्ये म्हणाले की, सुप्रिया सुळेजी तुम्हाला सध्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले.  उच्च न्यायालयात कायम राहिले. पण, तुमच्या महाआघाडीच्या आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या नाकर्तेपणामुळे ते पुढे टिकले नाही. तो विषय आता जुना झाला. काहीही घडले, की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरला सुरला पक्ष कसा टिकेल, ते पाहा. आजच तुमच्या पक्षाचा एक आमदार फुटून दुसऱ्या गटात गेला म्हणे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दगाफटका केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर समाजाला त्यांनी दगा दिला आहे. याला पूर्ण जबाबदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांनी एकनाथ शिंदेंनाही दगाफटका केला आहे, एका वकीलाचे स्पष्टीकरण आले आहे.ते  म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांना एमएलसी करु, म्हणजे यांना ते अपात्र होणार आहेत हे माहित होतं. म्हणजे अगोदर उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, आता ते त्यांचा घटक पक्षालाही दगा देत आहे. यामुळे माझी अजित पवार गटाला एक विनंती आहे, आपण कधीतर एका ताटात जेवलो आहे, ते आता शिंदेंनाही धोका देत आहे. त्यामुळे सांभाळून राहा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा