शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके आज काय सांगणार ? याकडेच सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 07:20 IST

हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली

पुणे : हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली असून त्यात ते आपली अटक टाळण्यासाठी कोणती योजना जाहीर करतात ? गेले वर्षभर त्यांच्या विषयी उलट सुलट बातम्या आल्या तरी त्याविषयी त्यांनी कधीही त्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, त्यामुळे आज ते काय सांगणार याकडे गुंतवणूकदार, फ्लॅटधारक यांच्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत.सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. या गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.एफडी धारकांच्या गुन्ह्याबरोबरच डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांच्या चार संचालकांवर कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता न भरता अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत सुरेंद्र जयसिंह फाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह संचालक विजयकुमार नथू जगताप, सहिंद्र जगन्नाथ भावळे आणि शन्मुख सोमेश्वर दुर्वासुला यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डीएसके यांच्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले असून त्यांचा तपास जोरात सुरू आहे.याशिवाय डीएसके यांच्या मालमत्तेवर आता बँकांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे पैसे भरूनही ताबा न मिळाल्याने असंख्य फ्लॅटधारकानी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तसेच एकच फ्लॅट बँकांकडे गहाण असताना तो परस्पर विकल्या ची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे आज डीएसके नेमके काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय