शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करावं?’, चिमुरडीचा शरद पवारांना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 05:46 IST

राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला.

सातारा : ‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ हा एका चिमुरडीने विचारलेला प्रश्न समोर आला आणि राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले व आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनाही थोडा विचार करावा लागला.  सांसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साता-यात शरद पवार यांचा सर्वपक्षीय गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे औचित्य साधून भावी पत्रकारांच्या बालचमुने त्यांना विश्रामगृहात गाठले. मुलाखत घेण्यासाठी ही चिमुरडी थेट समोर उभी ठाकताच पवारांच्या चेह-यावर कौतुकाचे भाव उमटले. ‘तुम्ही राजकारणात एवढे मोठे होणार, हे तुम्हाला बालपणी वाटले होते काय?’ समोर आलेल्या या अनपेक्षित प्रश्नावर ते मिश्कील हसले. खरं तर त्यांनी न बोलता उत्तर दिलं होतं, पण या बालसुलभ पत्रकारांना ते कसं कळणार!‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ एका चिमुरडीने मोठ्या धिटाईने विचारलेल्या या प्रश्नावर पवारांनी भुवया उंचावल्या. ‘आत्मविश्वास बाळगा, वक्तृत्व कलेचा अभ्यास करा,’ असं सांगत ‘हंऽऽ आता पुढचा प्रश्न?’ पुकारत हसत-हसत पवारांनी मुलाखत संपविली!चिमुकल्यांचा प्रश्न...पवारांची बगल‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ एका चिमुरडीने टाकलेल्या गुगली प्रश्नावर शरद पवार दिलखुलास हसले खरे, पण उत्तर न देता त्यांनी हा प्रश्न समोर बसलेल्या इतर लोकप्रतिनिधींकडे टोलविला! मग तिनंही हट्ट सोडला नाही.कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचे अन् कोणता प्रश्न टाळायचा, ही पवारांची खासियत या मुलांना माहीत नव्हती. हसत-हसत पवारांनी मुलाखत कधी संपविली, हे मुलांना कळलंदेखील नाही!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchildren's dayबालदिनSupriya Suleसुप्रिया सुळे