शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

समृद्धी महामार्गाची गरज काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 22:27 IST

नागपूर ते मुंबईसाठी आधीच तीन तीन मार्ग असताना चौथ्या मार्गाची गरज काय? असा खणखणीत सवाल आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - नागपूर ते मुंबईसाठी आधीच तीन तीन मार्ग असताना चौथ्या मार्गाची गरज काय? असा खणखणीत सवाल आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारशी बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा घडवून आणण्याचेही आश्वासन दिले. पोलीस बळाचा वापर करून जमिनीची मोजणी करणे, मोजणी करू न दिल्यास शेतमालकांची तुरुंगात रवानगी करणे, शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करणे हे प्रकार शासकीय यंत्रणेने तात्काळ थांबवले पाहिजेत, असा इशारा देत शरद पवार यांनी विकासाला मानवी चेहरा असायला हवा. लोकांची बरबादी करून होणाऱ्या विकासाला काही अर्थ नाही, असे खडे बोलही त्यांनी सरकारला सुनावले.नियोजित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी जात आहेत, अशा शेतकऱ्यांची परिषद आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्य मंदिरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सर्वच जिल्ह्यांचे शेतकरी आजच्या परिषदेस उपस्थित होते. मंचावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड आदींची उपस्थिती होती. यांच्यापैकी कुणाचेही यावेळी भाषण झाले नाही. या महामार्गाची ज्यांना झळ बसणार आहे, ते शेतकरी व त्यांच्या प्रतिनिधींनी मात्र आपले मनोगत व्यक्त केले. ते स्वत: शरद पवार यांनी अगदी मन लावून ऐकून घेतले. शिवाय यावेळी आलेल्या प्रत्येक निवेदनाचाही त्यांनी स्वीकार केला व त्यावरून ते सारखी नजरही मारीत होते. दोन बॅगा भरून हरकती..नाशिकचे राजू देसले हे बोलत होते. फासावर, जाऊ पण एक इंच जमीन देणार नाही, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, असे सांगत त्यांनी सोबत आणलेल्या दोन बॅगा भरून हरकती व निवेदने शरद पवार यांच्या समोर नेऊन ठेवली. त्यातली काही कागदपत्रे त्यांनी पाहिली. परिषद संपेपर्यंत या बॅगा पवार यांच्यासमोरच होत्या. या बॅगा सादर करताना नाट्यमंदिरात टाळ्यांचा कडकडाट होत होता. परिषदभर शरद पवारांवर निवेदनांचा वर्षाव होतच होता. अनेक जण निवेदन सादर करून त्यांच्या पायालाही स्पर्श करीत होते.समृद्धी महामार्गाचं नंतर बघू.. आधी सात बारा कोरा करून घ्या काल सरकारने घेतलेल्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयावर ओघाओघाने शरद पवार यांनी मत मांडलेच. समृद्धी महामार्गाचं नंतर बघू. आधी सात बारा कोरा करून घ्या. उद्यापासूनच तुम्ही ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेत जा, सहकारी सोसायट्यांमध्ये जा, तेथे सात बारा कोरा करून घ्या, कर्ज पदरात पाडून घ्या, असा सल्ला यावेळी पवार यांनी दिला. कर्जे कोणत्या प्रकारची असतात, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सरसकट म्हणजे सरसकट. आता त्यात तत्त्वत:, निकष असे शब्द कशासाठी? त्यामुळेच मला चिंता वाटते आणि माझ्या मनात शंका आहे. .................................................................................................प्रारंभी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यात बबन हरणे (ठाणे), भाऊसाहेब शिंदे (वैजापूर), चंद्रकांत क्षीरसागर (जालना), शेख रशीद शेख नूर (निधोना, जालना), बाळू हेकडे (माळीवाडा, औरंगाबाद), तुकाराम भस्मे (अमरावती), वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सिन्नरचे सोमनाथ वाघ, आमदार अमित झनक, कॉ. राम बाहेती, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, कोपरगावचे एल.एम. डांगे, आमदार पांडुरंग बरोरा, कॉ. भालचंद्र कांगो आदींचा यात समावेश होता. शहरं वाढताहेत, जमिनी जाताहेत.... शहरं वाढताहेत, त्यासाठी जमिनी जाताहेत. मग लोकांनी जगायचं कसं, असा सवाल करीत शरद पवार यांनी लोकसंख्या वाढली, पण जमिनी आहेत त्यापेक्षा कमी कमी होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्टतील एका तालुक्यातील ८२ हजार ८१२ हेक्टरपैकी आता २६ हजार ५१३ एवढीच जमीन शिल्लक आहे. कशाकशासाठी किती किती जमीन दिली याची आकडेवारीच त्यांनी यावेळी सादर केली.आता शेतकऱ्यांचे जे मनोगत ऐकले, त्यातून असं लक्षात आलं की, या प्रकरणाचा बारकाईने विचार करावा लागेल. एकत्रित भूमिका घेऊन सरकारशी चर्चा करू. त्याआधी पुन्हा सर्वसंबंधितांची बैठक घेऊ, एवढाच कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला. गडकरी मॉडेलला विरोधभाकप नेते कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, गडकरी मॉडेलला विरोध करण्याची गरज आहे. बुलेट ट्रेन कुणाच्या फायद्याची? कुणी मागणी केली? यासाठी पैसे आहेत? कायदा गुंडाळून ठेवणे हाच यांचा कायदा बनला आहे. काही तरी भव्य दिव्य करण्याच्या नादातून निर्माण झालेला गडकरी मॉडेल भ्रष्टाचाराचे कुरण ठरू पाहत आहे. शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीवर उभा राहिलेला शेंद्रा एमआयडीसीत किया कारखाना का येऊ शकला नाही. नागपूरच्या मिहानमध्येही काही आशादायी चित्र नाही. आता विकासाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाला शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीत. म्हणजे हा विकासाला विरोध वगैरे काही नाही. शेतकरी अडचणीत असताना त्याला ताकद देण्याची गरज आहे. राजकारण करण्यासाठी वा विकासाला विरोध करण्यासाठी शरद पवार इथे आलेले नाहीत. शेतकऱ्यांची दु:खे कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर ते मांडण्यासाठी जाणार कुठे? शरद पवार यांच्याकडे जाणार नाही तर कुठे जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार शेतकऱ्यांचा मृत्यू... समृद्धी महामार्गात जमीन जाणार म्हटल्यानंतर औरंगाबाद परिसरातील चार शेतकऱ्यांना ताण येऊन आपला जीव गमवावा लागला, याचा उल्लेख अनेकांनी केला. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करूनच आपल्या भाषणाची सुरुवात केली. पळशीच्या नानासाहेब पळसकर यांनी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे सांगितली व आम्हाला जमीनच द्यायची नाही, असे बजावले. भाषणाच्या शेवटी त्यांनी, ह्यजमीन आमच्या हक्काची... नाही कुणाच्या बापाचीह्ण अशी घोषणा दिली. समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. बबन हरणे यांनी तर, मूठभर सनदी अधिकाऱ्यांनी आतापासूनच या समृद्धी महामार्गाच्या अवतीभवतीची जमीन खरेदी करून ठेवलेली आहे, याकडे लक्ष वेधले. याबाबतीत मुख्यमंत्री भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप हरणे यांनी केला. फार तर १५-२० टक्के मोजणी.. आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाचे कुठेही काम सुरू झालेले नाही व ८५ टक्के तर सोडाच फारतर १५ ते २० टक्के मोजणी झाली असेल. सरकार संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. सरळ खरेदीने व्यवहार होईल, असे सांगण्यात येऊ लागले आहे. माजी आमदार डॉ.काळे यांनीही राज्य सरकारवर यांचं काहीच खरं नाही असं सांगत सरकारवर टीका केली.