शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या? न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:46 IST

१४ ऑक्टोबर २०२० रोजी वादळी पावसामुळे  कुंभारघाट येथील भिंत कोसळली. पावसापासून वाचण्यासाठी भिंतीखाली आश्रय घेतलेल्या सहा भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेला दोन वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराला काळ्या  यादीत टाकण्यात आले नाही.

मुंबई: पंढरपूर येथे २०२० मध्ये कुंभारघाटात संरक्षक भिंत कोसळल्यानंतर यंदा आषाढी एकदशीच्यावेळी या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना आखल्या? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.१४ ऑक्टोबर २०२० रोजी वादळी पावसामुळे  कुंभारघाट येथील भिंत कोसळली. पावसापासून वाचण्यासाठी भिंतीखाली आश्रय घेतलेल्या सहा भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेला दोन वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराला काळ्या  यादीत टाकण्यात आले नाही. तसेच त्याने ही भिंत पुन्हा उभारलीही नाही. त्यामुळे हा घाट आता भाविकांसाठी असुरक्षित आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याठिकाणी लाखो भाविक जमा होतील आणि त्यांचा जीव पुन्हा धोक्यात घालण्यात येईल, असे सोलापूरचे रहिवासी व व्यवसायाने वकील असलेले अजिंक्य संगीतराव यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.

घाटावर जाण्यास मनाई -५३८ मीटरचे बांधकाम कंत्राटदाराने पूर्ण केले. मात्र, २०२० मध्ये मुसळधार पावसामुळे कुंभारघाटावर उभारण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आणि सहाजणांचा जीव गेला.

राज्य सरकारच्यावतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, विप्रदत्त, चंद्रभागा, कासार, महाद्वार, कुंभार, उद्धव आणि वडार या सात घाटांना एकत्र जोडण्याचा निर्णय सरकारने २०१७ मध्ये घेतला. 

या घाटावरील डबर, दगड, माती साफ करण्याचे काम सुरू केले आहे. या घाटाला पूर्णपणे बॅरिकेड्स घालून नागरिकांना त्या घाटावर जाण्यास मनाई करण्यात येईल. भाविक उर्वरित सहा घाटांचा वापर पवित्र स्नानासाठी करू शकतील, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने या सर्व बाबी प्रतिज्ञापत्रात नमूद करण्याचे निर्देश कुंभकोणी यांना दिले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीMumbaiमुंबईCourtन्यायालय