शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 15:33 IST

एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच चॅलेंज दिले आहे. झाले असे की, गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते. यावेळी तेथे असलेल्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की, या आरक्षणावरून आपली सेक्यूरिटी वाढविण्यात आली होती. त्यावर मनसे टीका करतेय की, तुमच्या सेक्युरिटीवर दर महिन्याला २० लाख रुपये खर्च होत आहेत, सरकारचे जावई आहेत का? याला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे.

काय म्हणाले सदावर्ते -"कॅमेरे लावलेले आहेत, किती नोटा मोजल्या जात आहेत? हे बघायला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर खूप बोलू शकतो. आज ती वेळ नाही, आज तो विषय नाही. त्यांनी टोल नाके बघावेत आणि टोल नाक्यांवर किती पैसे मोजल जात आहेत? ते बघावं. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढे आणि माझ्यावर टीका करण्याऐवढे ते मोठे नाहीत,” असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

वन टू वन, समोरा समोर येऊ द्या, मीसांगतो... -यावेळी राज ठाकरे यांना खुले चॅलेंज देत सदावर्ते म्हणाले, “वन टू वन, राज ठाकरे आणि सदावर्ते येऊद्या, मी सांगतो... कुणी कार्यकर्ते, छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही.” 

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयात जाणार -महाठा आरक्षासंदर्भात बोलताना सदावर्ते म्हणाले, "मला आज असे सांगायचे आहे की, माझे मराठा भाऊ, जे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत,  त्या लाभापासून कुणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीने उभारलेले हे आंदोलन होते, असे मी समजतो. मात्र, आज आपण ते नोटिफिकेसन बघितले, तर ते नोटिफिकेशन नोटिस आहे. म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, माननीय उच्च न्ययालयात लवकरात लवकर, म्हणजे  मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे. या सर्व गोष्टींसाठी लवकच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल,"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणtollplazaटोलनाकाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना