शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिलेल्या त्या व्हिडीओंमध्ये नेमके आहे तरी काय? पहिल्यांदाच आले समोर; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 08:47 IST

Devendra Fadnavis allegations on sting operation: केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध हेतूत: षड् यंत्र रचत असल्याच्या सातत्याने होणाऱ्या आरोपांना फडणवीस यांनी या आरोपांच्या माध्यमातून उत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांना हाताशी धरून भाजपच्या अनेक नेत्यांना बनावट प्रकरणांत गोवण्याचे षड् यंत्र रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. या कटकारस्थानात पोलीस गुंतलेले असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध हेतूत: षड् यंत्र रचत असल्याच्या सातत्याने होणाऱ्या आरोपांना फडणवीस यांनी या आरोपांच्या माध्यमातून उत्तर दिले.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे विविध लोकांशी झालेले संवाद...

व्हिडीओ १वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे.ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशांतून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशांतून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. १ ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

व्हिडीओ २

  • तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?
  • ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. 
  • शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?
  • सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवी शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

 

व्हिडीओ ३

या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अ‍ॅड करायचे ते करा.सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला.अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण

  • रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सुक्ष्म नियोजन
  • जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत.
  • यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

 

व्हिडीओ १०

  • त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता.
  • एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते?
  • किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले?
  • दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जुन खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात.
  • गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

व्हिडीओ २०एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण संभाषण

  • हॉटेलचे बिल देऊ नका, १० हजार दिले आहेत.
  • तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहे.
  • पंचांची नावे मी व्हॉटस् अ‍ॅपवर पाठवितो.
  • दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील.
  • जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील. 

 

...हे मोठे षड् यंत्रआज सभागृहात क्लिप दिल्या आहेत, त्या पडताळून घ्या. हे सर्व प्रकरण गंभीर आहे. हे मोठे षड् यंत्र आहे. पण राज्य सरकारला कोणतेही प्रकरण गंभीर वाटत नाही. सिनेमामध्ये पाहतो त्यापेक्षा भयंकर चालू आहे. या कटात सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत. संबंधित सरकारी वकील तर काळ्या कोटातील वाझे निघाला. हे सर्व प्रकरण सीबीआयकडे द्यायला हवे. सरकारी वकील मोठे साहेब असे म्हणत आहे, म्हणजे शरद पवार यांचे नाव घेत आहेत का, याचीही चौकशी व्हायला हवी.  - आ. गिरीश महाजन, भाजप नेते

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन