शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षांत निष्ठावंतांवर अन्याय केला त्याचे काय, विकास सावंतांचा नारायण राणेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 06:02 IST

नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षांच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर किती वेळा अन्याय केला? त्याला काय म्हणायचे? याची तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला.

सावंतवाडी, दि. 23 -  नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षांच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर किती वेळा अन्याय केला? त्याला काय म्हणायचे? याची तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला. जर तुम्ही चांगले काम केले असे म्हणता, तर काँग्रेसमध्ये राहणा-यांना धमकावता कशाला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरुवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी शुक्रवारी येथील आरपीडी कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर आदी उपस्थित होते.यावेळी विकास सावंत म्हणाले, माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाते. ही टीका करीत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही विचार केला पाहिजे होता. भाईसाहेब सावंत पतपेढीबाबत चुकीची भूमिका जनतेसमोर मांडत आहेत. हा विषय सहकार न्यायालयात आहे आणि ते अठरा कोटी म्हणतात तसे काही नाही. दोन अंकी संख्या या कर्जाची नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नारायण राणे यांनी जर जिल्ह्यात चांगले काम केले आहे, तर आमच्यासोबत येणा-यांना त्यांचे कार्यकर्ते का धमकावतात, असा सवाल करीत जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत, त्यांनी राणेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा व पहिला राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी केले. माझ्यावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा दूत असल्याचे आरोप करतात. पण मी प्रदेशाचा सदस्य असल्याने माझे ते नेते होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे व्हायचे; पण कधीही राणे हा आमचा विषय नव्हता, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली आहेत. त्यात त्यांना महसूल, उद्योग अशी चांगली खाती दिली. तसेच एका मुलाला खासदार, दुस-याला आमदार केले. मग अन्याय कसा म्हणता, असा सवाल करीत आम्हाला गेल्या अनेक वर्षांत आपण कोणतीही पदे दिली नाहीत. तरीही आम्ही काँग्रेसमध्ये असल्याचेही विकास सावंत यांनी सांगितले. आमच्यासाठी पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. काँग्रेसवर राज्यात व जिल्ह्यात अनेक स्थित्यंतरे आली. तरी आम्ही कधीही डगमगलो नाही आणि डगमगणार नसल्याचे यावेळी सावंत यांनी जाहीर केले.