शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

पोलीस FIR नोंदवत नसतील तर काय कराल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 19:30 IST

गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर काहीवेळा काहीजणांना विचित्र अनुभव येतो.

ठळक मुद्देपोलीस अधिका-याने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला तर अशावेळी काय कराल ? 

मुंबई, दि. 7 - गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर काहीवेळा काहीजणांना विचित्र अनुभव येतो. पोलीस सहकार्य करण्याऐवजी मानसिक खच्चीकरण करत असल्याचा अनुभव येतो. 

पोलीस अधिका-याने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला तर अशावेळी काय कराल ? गुन्हा घडल्यानंतर तुम्ही एफआयआर दाखल करण्यास पोलीस स्थानकात गेलात आणि संबंधित पोलीस कर्मचा-याने अनावश्यक कारणे देऊन तुमचा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला तर, अशावेळी तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिका-याची भेट घ्या. त्यानंतरही गुन्हा नोंदवला गेला नाही तर, तुम्ही जवळच्या मॅजिस्ट्रेटकडे लिखित तक्रार करु शकता. मॅजिस्ट्रेट त्यानंतर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश देईल. एफआयआरची नोंद झाल्यानंतर रिसिप्ट घ्यायला विसरु नका.  

एखादी छोटी-मोठी घटना असेल किंवा हद्दीच्या मुद्यावरुन पोलीस अधिकारी एफआयआर नोंदवायला नकार देऊ शकतो. सध्याच्या कायद्यानुसार गुन्हा हा दोन प्रकारात मोडतो. एक दखलपात्र आणि दुसरा अदाखलपात्र. दखलपात्र गुन्ह्यात एफआयआर दाखल होतो. अदखालपात्र गुन्ह्यात मॅजिस्ट्रेट पोलिसांना कारवाईचे आदेश देतो. हत्या, बलात्कार, दंगल, दरोडा हे दखलपात्र गुन्हे आहेत. या गुन्ह्यांमध्ये पोलीस वॉरंट शिवाय आरोपीला अटक करु शकतात. फसवणूक, घोटाळा, सार्वजनिक उपद्रव हे अदाखलपात्र गुन्हे असून यामध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करु शकत नाहीत.