शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचे काय झाले? मंत्री पाटील यांनी घोषणा केली, पण अद्याप निर्णय नाही

By यदू जोशी | Updated: May 27, 2024 08:37 IST

मोफत शिक्षणाची अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असली, तरी अद्याप याबाबतचा शासन निर्णय (जीआर) निघालेला नाही. त्यामुळे मोफत शिक्षणाची अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

उच्च शिक्षणाच्या ६४२ अभ्यासक्रमांमधील विद्यार्थिनींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव येथे एका कार्यक्रमात केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे मंत्री पाटील हे अध्यक्ष आहेत. या उपसमितीने केवळ मराठाच नव्हे तर सर्व समाजाच्या मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १८ मार्च रोजी लागू झाली. त्याआधी मंत्रिमंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक होते. मात्र ते होऊ शकले नाही. त्यानंतर हा निर्णय आचारसंहितेत अडकला.

६५० कोटी रुपये वार्षिक बोजा सरकारच्या तिजोरीवर पडेल. सूत्रांनी सांगितले की, उच्च शिक्षण विभागाने या संबंधीची सर्व तयारी करून ठेवली आहे. अगदी जीआरचा मसुदादेखील तयार आहे.

मुलींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याच्या प्रस्तावावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुलींना उच्च शिक्षणात ६४२ अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा मी केली होती. सरकार त्यानुसार निर्णय घेणार आहे. मंत्रिमंडळाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. आचारसंहितेचा अडसरही दूर होईल.- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री 

टॅग्स :Educationशिक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील