शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:52 IST

राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. अदानी प्रकरण, सावरकर मुद्दा यावरून तिन्ही पक्षात मतभेद दिसून आले. त्यात महाविकास आघाडीचं भवितव्य आता सांगता येणार नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. 

'काका मला वाचवा म्हणायला तर...'; उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीवर शिंदे गटाचा निशाणा

सुमारे सव्वा तास शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली, त्यात महाविकास आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यावर शरद पवारांनी भाष्य करत म्हटलं की, काही मुद्द्यांवर वेगवेगळी मते असली तरी महाविकास आघाडीच्या पक्षांनी एक विचाराने काम करावे यासंदर्भात आमची चर्चा झाली. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली. 

मविआत मतभेदराज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि गौतम अदानी समुहातील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाले असताना शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री हा काही फार मोठा विषय नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून आले होते. 

पवार-ठाकरे भेटीवर शिवसेनेचा टोलाउद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी निशाणा साधला. सकाळी मातोश्रीवर स्वाभिमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्व्हर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं. सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा सवाल देखील शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला. त्याचसोबत मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्याचं देसाईंनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी