शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:50 IST

CoronaVirus News : राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांहून अधिक झाली आहे.

मुंबई/सिंधुदुर्ग : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं ठाकरे सरकारची चिंताही वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊनमधूनही काहीशी सूट दिली आहे. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांहून अधिक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी टीव्ही ९ला मुलाखत देत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो हाताळता जात  नाही. लोकल सेवा सुरू करून काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने आकडे कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.“निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी” अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गाला 25 कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारून काही होत नाही, असं टीकास्त्र राणेंनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे.  केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.हेही वाचा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे corona virusकोरोना वायरस बातम्या