शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भूखंडांवर लक्ष ठेवण्यासाठी काय केले?

By admin | Updated: April 7, 2017 02:08 IST

अतिक्रमण हटवलेल्या भूखंडांवर पुन्हा पुन्हा अतिक्रमण करण्यात येते.

मुंबई : अतिक्रमण हटवलेल्या भूखंडांवर पुन्हा पुन्हा अतिक्रमण करण्यात येते. या भूखंडांवर लक्ष ठेवण्यास मानवी यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने व महापालिकेने अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मोकळ्या भूखंडांवर लक्ष ठेवण्यासंदर्भात महापालिकेकडे काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई महापालिकेकडे केली.‘कित्येक वेळा असे घडते की संबंधित अधिकाऱ्यांना भूखंडाविषयी माहितीच नसते. त्यामुळे अशा भूखंडांवर लक्ष ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. लोक नेहमी इमारत बांधून पूर्ण झाल्यावर ती बेकायदा आहे, अशी ओरड करत न्यायालयात येतात. पण त्याचा पाया रचताना हे काय करत होते? त्या वेळीच त्यांनी न्यायालयात यायला हवे,’ असे निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेने केलेल्या एका अर्जाच्या सुनावणीत नोंदवले.मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे निर्देश महापालिकेला द्यावेत. अन्यथा मुंबईकरांचे आरोग्य व सुरक्षा धोक्यात येईल, अशी जनहित याचिका ‘जनहित मंच’ या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने २००९ मध्ये पाण्याच्या पाइपलाइनच्या दोन्ही बाजूंना १० मीटर अंतर बफर झोन म्हणून ठेवण्याचा आदेश महापालिकेला दिला. तसेच या हद्दीत असलेल्या सर्व पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे, असा आदेशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला.मात्र ताडदेवमधून जाणाऱ्या पाइपलाइनच्या दोन्ही बाजूंना १० मीटर अंतर सोडून १०० झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे अशक्य असल्याने महापालिकेने केवळ ताडदेवसाठी ही अट शिथिल करण्याकरिता उच्च न्यायालयात अर्ज केला. उच्च न्यायालयाने ही अट शिथिल केल्यास तसा पायंडा पडणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी दिले. त्यावर उच्च न्यायालयाने ही अट शिथिल केल्यानंतर उर्वरित भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काय हमी, अशी विचारणा महापालिकेकडे केली. अतिक्रमण हटवलेल्या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, हे पाहण्यासाठी तुमच्याकडे (महापालिका) काय यंत्रणा आहे? यावर लक्ष ठेवण्यास मानवी यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यावर अवलंबून राहूही नका. तंत्रज्ञान एवढे प्रगत असताना आपण एवढे असाहाय्य असल्याचे का वाटून घेतो? तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बेकायदा इमारती आणि मोकळ्या भूखंडांवर लक्ष ठेवणे शक्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेने २००९ च्या आदेशानंतर आतापर्यंत काय केले आहे, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >मानवी यंत्रणेवर विसंबून राहू नकाअतिक्रमण हटवलेल्या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, हे पाहण्यासाठी तुमच्याकडे (महापालिका) काय यंत्रणा आहे? यावर लक्ष ठेवण्यास मानवी यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यावर अवलंबून राहूही नका. तंत्रज्ञान एवढे प्रगत असताना आपण एवढे असाहाय्य असल्याचे का वाटून घेतो? तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लक्ष ठेवणे शक्य आहे