शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू; जाणून घ्या, काय असते Code of Conduct!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 12:40 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 21 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत.

निवडणूक... मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच, Model Code of Conduct.

निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत. त्यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. निवडणूक आयोगाने आज विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर ही आचारसंहिता राज्यभरात लागू झाली आहे. या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

आचारसंहिता म्हणजे काय ?- निवडणुक आयोग ज्या वेळेस निवडणुका जाहीर करते त्यावेळेपासून आचारसंहिता लागू होते. निवडणूक आयोग एक पुस्तिका छापतं, त्याच्यात राजकीय पक्षांनी या काळात काय करावं आणि काय करु नये याची माहिती दिलेली असते. या पुस्तिकेत प्रलोभनांपासून सरकारी मालमत्तेचा वापर, सरकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं तसंच करु नये याची यादी दिली जाते. उदा. या काळात सरकारी वेबसाईट आदींमधून मंत्र्यांचे, पंतप्रधानांचे फोटो काढून टाकण्यात येतात.

आचारसंहितेत कुठली बंधनं येतात ?- प्रचारासाठी राजकीय पक्षाकडून किती गाड्या वापरण्यात येणार आहेत, किती लोक असणार याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खर्चाची अट टाकण्यात येते. त्या रकमेच्या आतच त्याला खर्च करता येतो. तसंच मोठे पक्ष निवडणुकीच्या काळात जो खर्च करतात, तो उमेदवाराच्या वैयक्तिक खर्चामध्ये धरण्यात येतो.

*आचारसंहितेच्या काळात पाळायची ठळक पथ्यं*

टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणांवर करा. कामं, वचनं पूर्ण केली नसतील त्यावर बोट ठेवा. परंतु, एखाद्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून टीका नको.

मतदारांकडे मतं मागताना आपण केलेली कामं दाखवा. कुठल्याही वस्तूचं आमीष देणं किंवा धमकावणं हे कायद्यात बसत नाही.

सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं हा आचारसंहितेचा भंग ठरतो. मंत्री म्हणून दौऱ्यावर गेलेल्या नेत्याने त्याच्या पक्षाच्या बैठकीत सहभागी होणं योग्य नाही.

आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत किंवा एखाद्या योजनेसाठी निधीही जाहीर करता येत नाही.

सगळेच पक्ष आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनं देत असतात. परंतु, मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतील, अशी आश्वासनं देणं आचारसंहितेत बसत नाही.

मतदान केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांच्याशिवाय कुणालाही जाण्याची परवानगी नसते. म्हणूनच, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर अनेक पक्षांचे कार्यकर्ते टेबल टाकून बसल्याचं पाहायला मिळतं.  

एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करता येते. त्यानंतर, आयोगाचे निरीक्षक तपास करून कारवाईबाबत निर्णय घेतात. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई