शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 22:14 IST

विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. - नीलम गोऱ्हे

पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. ज्या अपेक्षेने आमचे ६३ आमदार आलेले, बाकीच्या ठिकाणी थोडक्यात पडलेले, दुसऱ्या क्रमांकावर असलेले लोक होते. या लोकांचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा कल सुरु झाला होता. दुसरे असे की दर तीन महिन्यांनी भाजपासोबत युती तुटेल की राहिल हेच कळत नव्हते, असे विधान परिषद उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांंनी केले.

आम्हाला मत विचारलेच गेले नाही. महापौर बंगल्यामध्ये मुख्यमंत्री कोण करायचे तेव्हा मला मत विचारले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंनीच व्हावे अशी भूमिका घेतली होती. असे कोणाला वाटले होते की संघटना पूर्ण शून्य होईल, उलट ते मुख्यमंत्री झाले तर संघटना आणि पक्ष दोन्हींना गती येईल असे वाटले होते. त्याच्यात कोरोना येईल असे अपेक्षित नव्हते. तसेच एवढे बंदिस्त राजकारण होईल असेही वाटले नव्हते. यापूर्वी ते जे काम करू शकत होते. ते ते करू शकत नव्हते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने काय काय बिघडले हे गोऱ्हेंनी सांगितले.  

आमदारांचा निधी कापला गेला, मंत्र्यांचा निधी कापला गेला हे काही माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते. ते त्यांच्यासोबत वैयक्तिक होत होते. विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. मी शिवसेनेसाठीच काम करत आहे. एवढ्या अनुभवानंतर मी घडाघडा बोलू शकते, परंतू आपल्याकडून बोलता बोलता इकडचा तिकडचा शब्द जातो, तो जाऊ नये म्हणून मी भाषण वाचले असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना