शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार?

By हेमंत बावकर | Published: December 25, 2018 10:56 AM

टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत.

नवी मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नुकत्याच जारी केलेल्या निर्णयानुसार डीटीएच कंपन्यांना 29 डिसेंबरपासून 100 चॅनल 130 रुपयांच्या किंमतीमध्ये दाखवावे लागणार आहेत. मात्र, टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये 29 डिसेंबरपूर्वी हे चॅनेल न घेतल्यास डीटीएच बंद होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

महत्वाचे म्हणजे आपण आधी हे समजून घेतले पाहिजे की ट्रायने हा निर्णय का आणि कोणाच्या फायद्यासाठी घेतला. टाटा स्काय, व्हिडिओकॉन, डीश टीव्ही, एअरटेलसाख्या डीटीएचवर देशाच्या भागानुसार पॅकेज देण्यात येत होते. यानंतर तुम्हाला मातृभाषेचे चॅनेल हवे असल्यास वेगळे पॅकेज, खेळांचे हवे असल्यास वेगळे, छोट्यांसाठीचे चॅनेल वेगळे आणि एचडीसाठी वेगळे असे भरमसाठ पैसे भरावे लागत होते. तसेच जवळपास 1100 चॅनेल दाखविले जात होते. यापैकी फारतर महिनाभरात 10 ते 20 चॅनल आवडीनुसार पाहिले जातात. यामुळे उरलेल्या चॅनलचे पैसे चॅनल न पाहताही भरावे लागत होते. यामुळॆ लाखो ग्राहकांनी ट्रायकडे याबाबत तक्रार केली होती. यावर ट्रायने हा निर्णय घेतला आहे. 

29 डिसेंबरनंतर होणार महत्वाचा बदल म्हणजे आपल्याला हवे ते चॅनेल निवडता येणार आहेत. जर ग्राहक मराठी असेल तर त्याला साऊथचा म्हणजेच दक्षिणात्य पॅक घ्यायची गरज राहणार नाही. केवळ मराठी चॅनेल म्हणजेच स्टार, झी, आणि बातम्यांचे चॅनेल गरजेनुसार घेता येणार आहेत. शिवाय एखाद्या कंपनीचे सर्व चॅनेल पॅकेजमध्ये घेता येणार आहेत. उदा. स्टार टीव्हीचे चित्रपट, मालिका, स्पोर्ट असे वेगळे पॅकेजही कमी पैशांत पाहता येणार आहे. यामुळे अतिरिक्त चॅनलसाठी जो पैसा वसूल केला जात होता तो वाचणार आहे. या पॅकसह एखादा हिंदी, इंग्रजी बातम्या, सिनेमाचे चॅनलही वेगवेगळे खरेदी करता येणार आहेत. 

टाटा स्कायच्या प्रतिनिधीशी लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप 29 डिसेंबरनंतरचे चॅनलचे दर ठरलेले नसून दर ठरल्यानंतर ग्राहकांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तोपर्यंत सध्या घेतलेले पॅकेज सुरु ठेवू शकता. 29 डिसेंबरनंतर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावरून डीटूएच प्रतिनिधींशी बोलून हवे असलेले चॅनेल, पॅकेज ग्राहक निवडू शकतात, असे सांगितले. 

जो चॅनल पाहाल...त्याचेच पैसे द्याल...समजून घ्या DTH चे नवे गणित...

100 चॅनेलमध्ये काय काय? 100 चॅनेल्समध्ये 26 चॅनेल हे दूरदर्शनचे असणार आहेत. शिवाय उर्वरित चॅनेलमध्ये मालिका, सिनेमा, किड्स, म्युझिक, स्पोर्ट, न्यूज, इन्फोटेन्मेंट, डिव्होशनल सारखे प्रत्येक श्रेणीतील प्रत्येकी 5 चॅनल दाखवावे लागणार आहेत. तसेच विकत घ्यायच्या चॅनेलची किंमत 19 रुपयांपेक्षा जास्त जाणार असेल तर तो पॅकेजमध्ये न देता वेगळा द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे डीटीएचचे बिल 300 रुपयांबाहेर जाणार नसल्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनDTHडीटीएच