शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

विहिरी-कुपनलिका दुरुस्तीची मोहीम

By admin | Updated: May 17, 2016 04:19 IST

पालिकेने १२८ विहिरींची सफाई केली असून नव्याने १६८ कुपनलिका उभारल्या आहेत.

ठाणे : शहराला सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने ठाणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ नये म्हणून यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरात असलेल्या विहिरी आणि कुपनलिकांची दुरुस्तींची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पालिकेने १२८ विहिरींची सफाई केली असून नव्याने १६८ कुपनलिका उभारल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होऊ लागला आहे. ठाणे शहराला आजघडीला रोज सुमारे ४८० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतांनादेखील प्रत्येक मंगळवारी शहरातील आणि बुधवार गुरुवारी कळवा, मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या याच पाण्याचा वापर ठाणेकर गाड्या धुणे, बगिचांना पाणी घालणे आणि इतर कामांसाठी करीत आहे. तसेच महापालिकादेखील यापूर्वीच याच पाण्याचा आधार घेत होती. परंतु, २०१० मध्ये ठाणे महापालिकेने शहरात असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शहरात असलेल्या परंतु, दूषित झालेल्या विहिरींची शोध मोहीम हाती घेतली होता. त्यानुसार शहरात विविध भागात ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली होती. यातील काही पडीक, वापरात नसणे, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, तर काही विहिरी कोरड्या पडल्या होत्या. काहींमध्ये गटारांचे पाणी गेल्याने ४० टक्के भूर्गभजलातील पाणी साठा हा अशा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्व्हेत पुढे आली होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. त्यातील पाण्याच्या साठ्याचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी हे वापरास अयोग्य तसेच ते पिण्यास अयोग्य असल्याचाही निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत. त्यातील पाणी आता महापालिका उपयोगात आणत आहे. त्यानुसार पालिकेने यंदा सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात या विहिरी इतर कामांसाठी वापरात आणण्याचे निश्चित करुन त्या तील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. त्यात आतापर्यंत १२८ विहिरांचा गाळ काढून त्या वापरात आणल्या गेल्या आहेत. तर उर्वरित विहिरींची साफसफाईची कामे येत्या २० मे पर्यंत पूर्ण होतील, असा दावा पालिकेने केला आहे. (प्रतिनिधी)>१६८ नव्या कूपनलिकाया विहिरींबरोबरच शहरात असलेल्या कुपनलिका दुरुस्त करण्याची मोहिमही देखील तीव्र केली आहे. शहरात १३७० सार्वजनिक कुपनिलिका आहेत. त्यातील ७८६ कुपनलिका या हातपंपासहीत असून त्यांच्या वापर झोपडपट्टी भागातील रहिवासी करीत आहेत. २२४ कुपनलिका विद्युत पंपासह असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्रे, रुग्णालये, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी केला जात आहे. पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांत ३६० कुपनिलिकांचा वापर केला जात आहे. दरम्यान सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिकेने मागील वर्षी ठरविलेल्या नियोजनानुसार आतापर्यंत नव्याने १६८ कुपनिलका खोदल्या असून त्यातील ९२ कुपनलिकांचा वापर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना होत आहे. ४२ कुपनलिकांचा वापर सार्वजनिक उद्याने, अग्निशमन केंद्रे व स्मशानभूमी याठिकाणी होत आहे. परंतु, ३४ कुपनलिकांना पाणी न लागल्याने त्या बंद ठेवल्या आहेत.