शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वजन-मापे निर्माते, दुरुस्तकांचे परवाने रद्द

By admin | Updated: July 27, 2015 00:47 IST

वैध मापनशास्त्र विभागाने क्षुल्लक कारणे दाखवून राज्यातील ४००० वजन-मापे निर्माते व दुरुस्तक (देखभाल, दुरुस्ती करणारे) यांचे परवाने तडकाफडकी

सोपान पांढरीपांडे, नागपूर वैध मापनशास्त्र विभागाने क्षुल्लक कारणे दाखवून राज्यातील ४००० वजन-मापे निर्माते व दुरुस्तक (देखभाल, दुरुस्ती करणारे) यांचे परवाने तडकाफडकी रद्द केल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे काही उद्योजकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर याचिका दाखल केली आहे.राज्यात वैध मापनशास्त्र विभागाचे एकूण ५३०० परवानाधारक होते. त्यापैकी २५० परवानाधारक उत्पादक होते. ५००० परवानाधारक वजन, मापे, तराजू यांची देखभाल व दुरुस्ती करणारे व विक्रेते होते. हे परवाने साधारणत: एक वर्षाकरिता दिले जातात व त्यांचे नूतनीकरण १ जानेवारीपूर्वी होत असते. यावर्षी मात्र या सर्व उद्योजकांनी डिसेंबर-२०१४ मध्ये नूतनीकरणासाठी अर्ज केले; त्यापैकी काही मोजक्या परवान्यांचे नूतनीकरण झाले व इतर परवाने प्रलंबित राहिले व जून-जुलैमध्ये वैध मापनशास्त्र विभागाने सर्व परवाने एका झटक्यात रद्द केले.परवाना नसल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून या उद्योजकांचा व्यवसाय बंद होता. आता परवानेच रद्द झाल्याने हे उद्योजक आणि त्यांचे कामगार-कर्मचारी उपासमारीच्या वाटेवर आहेत. वैध मापनशास्त्र विभागाविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला असला तरी भीतीपोटी कुठलाही उद्योजक उघडपणे बोलायला तयार नाही. अधिक चौकशी केली असता हे संकट वैध मापनशास्त्र विभागाचे नवे नियंत्रक संजय पांडे यांनी कामकाजात अचानक सुरू केलेल्या सुधारणांमुळे उभे झाले असल्याचे समोर आले.आॅक्टोबर २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पांडे यांनी व्यवस्था बदलासाठी एका पाठोपाठ एक परिपत्रके काढणे सुरू केले व त्यामुळे सर्वच परवानाधारक त्रस्त झाले. पांडे यांनी काढलेली २२ आॅक्टोबर व २७ आॅक्टोबरची परिपत्रके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविली आहेत. एका परिपत्रकाद्वारे पांडे यांनी दुरुस्तकांना सरकारी फी वसूल करण्यावर बंदी घातली होती तर दुसऱ्या परिपत्रकाद्वारे फी वसूल केली तर लायसन्स रद्द करण्याचे फर्मान काढले होते. नागपूर विभागात वैध मापनशास्त्र विभागाचे ५० परवानाधारक आहेत. त्यापैकी ४५ परवाने रद्द झाले आहेत.यासंबंधी संजय पांडे यांना संपर्क केला असता त्यांनी ४००० परवाने रद्द केल्याचे मान्य केले. आमच्या विभागाकडे अतिशय संवेदनशील असे काम आहे. वजने, मापे, वे ब्रिजेस किंवा धरमकाटे यांनी अतिशय शास्त्रशुद्ध आणि तंतोतंत वजन किंवा आकार दाखवलाच पाहिजे. एका मशीनमध्ये लहानसा बिघाड झाला तरी हजारो/लाखो ग्राहकांचे नुकसान होते. त्यामुळे आम्ही अतिशय काटेकोरपणे ‘काम करतो’, असे ते म्हणाले. यापूर्वी आमच्या विभागात तंतोतंत वजन मापे व गुणवत्ता यावर भर दिला जात नव्हता, म्हणून चीनमधून तकलादू सुटेभाग आणून भारतात उत्पादकांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटे बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला अधिक कडक नियम बनवावे लागले आहेत, असे ते म्हणाल आपल्या सुधारणा उद्योजकांना त्रास न देता होऊ शकत नाही काय या प्रश्नावर पांडे म्हणाले, उद्योजकाला अन्याय झाला असे वाटत असेल तर त्याने सरळ माझ्याकडे दाद मागायला हवी. मी सर्वांना न्याय देण्याचे वचन देतो. आपला कारभार एवढा पारदर्शी आहे तर उद्योजक कोर्टात का गेले, या प्रश्नावर मात्र पांडे यांच्याकडे उत्तर नव्हते.