शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

विवाहसोहळ्याचा होतोय इव्हेंट!

By admin | Updated: April 18, 2017 02:46 IST

विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा

पुणे : विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा, यासाठी वधू आणि वरपक्षाची लगबग सुरु असते. मात्र, आजकाल विवाह सोहळा खर्चिक बनला आहे. एकीकडे कार्यालयांचे भाडे, मानपान याचे खर्च वाढत असताना लग्नासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रक्ट दिले जात आहे. प्री-वेडिंग फोटो शूट, डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग यामुळे लग्नाच्या खर्चाने लाखांचा टप्पा गाठला आहे.बदलत्या काळाप्रमाणे नववनवीन ट्रेंड डोकावत असतात. विवाह सोहळाही त्याला अपवाद राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपला विवाह हटके पध्दतीने पार पडावा, अशी तरूण-तरुणींची इच्छा असते. लग्न सोहळयात कामांची यादी संपता संपत नाही. प्रत्येकाला खुश ठेवता यावे, वरपक्षाला उणीव काढण्याची संधी मिळू नये, असाच वधू पक्षाचा प्रयत्न असतो. विवाहसोहळा कोणत्याही अडथळयाशिवाय पार पडावा, यासाठी इव्हेंट कंपनीला पाचारण केले जाते. इव्हेंट कंपनीकडील पॅकेज साधारणपणे ५ लाख रुपयांपासून सुरु होते. इव्हेंट कंपनीला काम सोपवले की वधू पक्षाचा बरासचा भार हलका होतो. मात्र, खर्चाचे गणित वाढते. बरेचदा, वरपक्षाकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी इव्हेंट कंपनीची निवड केली जाते. बरेचदा, पालकांपेक्षा मुलगा-मुलगीच याबाबतीत पुढाकार घेतात. पालक याबाबतीत फारसे उत्सुक नसतात. त्यामुळेच लग्नांचा इव्हेंट होताना पहायला मिळत आहे.प्री-वेडिंग फोटो शूटपासून लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मध्यमवर्गीय कुटुंबांमधील तरुणांमध्ये ही के्रझ मोठ्या प्रमाणात आढळून येते. फोटोग्राफरच्या मदतीने फोटो शूटचे ठिकाण, थीम आदी बाबी ठरवल्या जातात. या शूटचा खर्च साधारणपणे १० हजार रुपयांपासून सुरु होतो. गेल्या दोन वर्षात या ट्रेंडची मागणी खूप वाढली आहे. पर्वती, खडकवासला, सिंहगड या ठिकाणांपासून गोव्यापर्यंत कोणतेही आवडीचे ठिकाण ठरवून तेथे फोटो शूट केले जाते. या निमित्ताने मुला-मुलीला एकमेकांना समजून, जाणून घेण्याची संधी मिळते, असे मत तरुणांची ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.