शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Weather: ‘या’ ढगांचा थर साचून पडताेय कमालीचा पाऊस, आकाश क्युम्युलोनिंबस ढगांनी वेढले

By श्रीकिशन काळे | Updated: April 16, 2023 13:44 IST

Weather Update: दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे.

- श्रीकिशन काळे पुणे : दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे. या ढगांची भली मोठी उंच इमारत आकाशात साकारते त्याने कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याची किमया होते. विध्वंसक ढग म्हणून याची ओळख आहे.

आकाशात वेगवेगळ्या उंचीवर क्युम्युलोनिंबस ढग असतात. सिरस प्रकारचे ढग वरच्या ढगांत मोडतात. आकाशात सर्वात उंच हेच ढग दिसतात. मध्यम उंचीच्या क्युम्युलस ढगाला आल्ट्रोक्युम्युलस म्हणतात. मध्यम उंचीच्या स्ट्रॅटस ढगाला आल्ट्रोस्टॅट्रस म्हणतात. आपल्या देशातील माॅन्सूनचे ढग याच प्रकारचे असतात. क्युम्युलस १५०० मीटर, क्युम्युलोनिंबस ४००० तर सिरस ढग १५०००  मीटर उंचीवर असतात. निम्बस प्रकारचे ढग दाट आणि भुऱ्या रंगाचे असून ते पाऊस देतात.

‘क्युम्युलोनिंबस’ची वैशिष्ट्ये काय? विपरीत हवामानाचा ढग एकमेव तो म्हणजे क्युम्युलोनिंबस आहे. काही मिनिटांत त्याचा उंच मनोरा तयार होतो. त्याचा तळ जमिनीवरून एक-दाेन किमी असला तरी त्याचे वरचे टोक १२-१३ किमीपर्यंत किंवा त्याहून वरपर्यंत जाते.   

क्युम्युलोनिंबस हा एक वादळी मेघ आहे. त्यातील विजेचा लखलखाट दूरपर्यंत दिसतो. जमिनीवर वीज कोसळते ती याच ढगांतून. या ढगांचा जीवनकाळ अर्धा तास किंवा एक तास असतो. तेवढ्यात मुसळधार पाऊस येतो. वादळी वारे येतात.- डॉ. रंजन केळकर, माजी महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग  

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस