शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नाराज वडेट्टीवारांसाठी भाजपाने उघडलंय दार; पहिला धक्का देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 13:41 IST

दुय्यम खाती मिळाल्यानं नाराज झालेल्या वडेट्टीवारांसाठी भाजपाची मोर्चेबांधणी

नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपावर नाराज असलेल्या मंत्र्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपानं सुरू केल्याचं दिसत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार दुय्यम खातं मिळाल्यानं प्रचंड नाराज आहेत. ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी भाजपानं हालचाली सुरू केल्या आहेत. माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवारांनी योग्य निर्णय घ्यावा. त्यांचं भाजपामध्ये स्वागतच आहे, असं म्हणत थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे.महाविकास आघाडी सरकारनं खातेवाटपात विदर्भावर अन्याय केल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. 'विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आहे. मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या नेत्याला दुय्यम खाती देऊन त्यांचं मनोधैर्य खचवण्यात येत आहे. वडेट्टीवारांना महत्त्वाचं खातं द्यायला हवं होतं. दुय्यम दर्जाचं खातं देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. आता त्यांनी योग्य निर्णय घ्यायचा आहे. ते भाजपामध्ये आल्यास आम्ही त्यांचं स्वागतच करू,' असं बावनकुळे म्हणाले. विजय वडेट्टीवार आणि सुनिल केदार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना विदर्भात आहे. अनेक वर्षांपासून निवडून आलेल्या या नेत्यांची पक्षानं दुय्यम खात्यांवर बोळवण केली, असं बावनकुळे यांनी म्हटलं. विदर्भाच्या विकासासाठी या भागातील मंत्र्यांना सिंचन, जलसंधारण, कृषी यासारखी खाती मिळायला हवी होती. आमच्या सरकारच्या काळात विदर्भाकडे गृह, अर्थ, वन, ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती होती. मात्र यातलं उर्जा सोडल्यास एकही खातं आता विदर्भाकडे नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. मागील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला अशी दुय्यम खाती देण्यात आल्यानं विदर्भातील काही कॉंग्रेस नेते, कार्यकर्तेही नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे