शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवू

By admin | Updated: July 31, 2016 04:18 IST

भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे.

पुणे : भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य करण्याचा अधिकार नाही. असे भाष्य करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि ‘भारतशक्ती डॉट इन’ यांच्या वतीने संरक्षण विश्लेषक नितीन गोखले लिखित ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पर्रीकर बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर अध्यक्षस्थानी होते. या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वायुदलाचे माजी उपाध्यक्ष ए. एम. भूषण गोखले, सियाचिन विषयक तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, लेखक नितीन गोखले आदी यामध्ये सहभागी झाले होते. पर्रीकर म्हणाले, ‘‘भारतीय सैन्य अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि शक्तिशाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हेच अंतरिम ध्येय डोळयासमोर ठेवून सैन्य देशासाठी प्राणपणाने लढते. आपले सैन्य क्रूरपणे कोणत्याही भागात घुसखोरी करुन विनाकारण हल्ला चढवत नाही. भारतीय सैन्याचीही काही तत्वे आहेत आणि ती काटेकोरपणे पाळली जातात. सोशल मिडियाच्या माध्यमातून सैन्याबाबत गैरसमज पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होतात. अशा बनावट व्हिडिओंवर विश्वास न ठेवू नये. सैन्य बळकट आहेच; त्यांना नागरिकांचाहीपाठिंबा मिळणेही महत्वाचे आहे. देशभक्ती हे आपले परम कर्तव्य आहे. या गुणांचे बाळकडू घरातूनच मिळत असते. आर्थिक सत्ता आणि सक्षम, बळकट सैन्य असेल तर देशासमोरील सर्व समस्या सुटू शकतात. त्यामुळेच देशावर कोणतेही संकट आल्यास सैन्य हातावर हात धरुन बसणार नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. सरकारही सुरक्षेसंदर्भात आक्रमकपणे मात्र संयमी भूमिका मांडत आहे.’’भूषण गोखले म्हणाले, ‘संकटातून संधी शोधणे आणि युध्दाचा अंत ही आपली उद्दिष्टे असायला हवीत. १९७१ च्या युध्दात सीमा निश्चित न झाल्याने सियाचिनचा प्रश्न उभा राहिला. सियाचिन ही भारताची अमूल्य संपत्ती आहे आणि ती इतर कोणाच्याही हाती सोपवली जाणार नाही.’पुस्तकाचे लेखक नितीन गोखले यांनी पाकिस्तान आणि चीनला हातमिळवणी करता येऊ नये, यासाठी सियाचीनवर तळ ठोकून राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. सियाचिन पाकिस्तानला देऊन टाका, असे म्हणणारे लोक देशद्रोही आहेत. भारतीय सैन्याच्या पराकष्ठेमुळे हा भाग अद्याप भारताच्या ताब्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)