शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संकटप्रसंगी मतभेद सोडून पंतप्रधानांसोबत उभे राहू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:10 IST

शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, उपनेते यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा, अडचणींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले. 

मुंबई : देशात एक वेळ भाजप राहणार नाही; पण काश्मीर काल आपलेच होते, आजही आहे आणि उद्याही राहील. आम्ही देशाच्या विरोधात नाही तर सरकारविरोधात आहोत. पंतप्रधान मोदींसोबत वैचारिक मतभेद आहेत, असतीलही; पण देशावर संकट येईल त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले. 

शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, उपनेते यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा, अडचणींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले. 

ओव्हरलोड भाजपला बुडण्याची भीती‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे ठीक आहे; पण निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या प्रचारात उतरू नये. अन्य पक्ष फोडून भाजपचे जहाज ओव्हरलोड झाल्यामुळे ते बुडण्याची भीती वाटत आहे. अमित शहा हे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.

लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित कराभारत- पाक युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील अन्य प्रश्न बाजूला राहिले आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. लाडकी बहीण, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचाराच्या घटना, पाणीटंचाईसारखे जनजीवनाशी निगडित प्रश्नांवर काम करावे, असा सूचना पक्षप्रमुखांनी केल्याची माहिती खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना