शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही केजरीवालांच्या पाठीशी, ही वेळ वाद घालण्याची नाही; पवार राज्यसभेत पाठिंबा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:23 IST

लोकशाहीसाठी संसदेत राष्ट्रवादी ‘आप’ला पाठिंबा देणार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील लोकशाही वाचविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असे सांगत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात संसदेत आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.   

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्राने अध्यादेश काढून नायब राज्यपालांनाच प्रशासकीय अधिकार दिल्याचा निषेध करत या अध्यादेशाचा राज्यसभेत विरोध करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘आप’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्राचे हे धोरण म्हणजे देशाअंतर्गत लोकशाहीवरील संकट आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने या अध्यादेशाचा राष्ट्रवादी विरोध करेल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.     

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गुरुवारी पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग, राघव चड्डा आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. केंद्राच्या या असंवैधानिक विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केजरीवाल यांनी पवारांचे आभार मानले. तर, सध्या देशाच्या लोकशाहीवरील संकट दूर करण्याची क्षमता पवार यांच्यातच आहे, असे भगवंत मान यावेळी म्हणाले.   

केजरीवालांचे ‘ते’ शब्द मी बोलू शकत नाही - फडणवीससोलापूर : अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी शरद पवार यांच्याबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी माझ्या तोंडून बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही वक्तव्य केले होते. केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून ही मंडळी आता एकत्र येत आहेत. मात्र, मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ही वेळ वाद घालण्याची नाहीही वेळ आपण कोणत्या पक्षाचे किंवा तुमची नीती काय आहे यावर वाद घालण्याची नाही. ही वेळ आहे लोकशाही वाचविण्याची, संसदीय लोकशाही वाचविण्याची. तसेच सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार वाचविण्याची वेळ आहे.    - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा