शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला पाहिजे; पंकजा मुंडेंची सूचक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 19:00 IST

राज्य नेतृत्त्वावर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा निशाणा

बीड: यशामध्ये भागीदार होता, तर पराभवाचीदेखील जबाबदारी घ्यायला हवी. आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हवा, अशा सूचक शब्दांमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन समर्थकांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपापासून काहीशा दूर गेलेल्या पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगत पक्षाच्या राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'गोपीनाथ मुंडेंना एखाद्याला जवळ करायचं असेल, तर त्यामुळे दूर जाऊ शकणाऱ्या व्यक्तीला ते आधी जवळ करायचे. अशाच प्रकारे त्यांनी माणसं जपली,' असं मुंडे म्हणाल्या.भाजपा सोडणार याबद्दलच्या वावड्या कुठून उठवण्यात आल्या, याबद्दल मला कल्पना नाही. नाराज हा शब्दच मला आवडत नाही. मी कोणावर नाराज होऊ, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाकडून पद मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याच्या दाव्यांचा त्यांनी पूर्णपणे इन्कार केला. मी ज्यांच्याकडे काही मागावं, अशी कोणतीही मोठी व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही. सध्या जे कोणी आजूबाजूला आहेत, त्यांच्यासोबत मी बरोबरीनं काम केलं आहे, असंदेखील त्या म्हणाल्या.महाराष्ट्र विकास आघाडीवर सध्या भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र पंकजा मुंडेंनी याबद्दल काहीशी वेगळी भूमिका मांडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. मात्र आपण एखादी गोष्ट केली नसेल, तरच आपल्याला त्यावरुन टीका करण्याचा अधिकार असतो. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याआधी भाजपा आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे मला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर मला टीका करावीशी वाटत नाही, अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडे