शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर

By प्रविण मरगळे | Updated: March 17, 2025 19:46 IST

राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरीत तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली.

सांगली - गेल्या अनेक वर्षापासून राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी बऱ्याचदा मोर्चे काढण्यात येतात. परंतु मागील ४३ वर्षात राज्य शासनाकडून धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही आणि कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नाही अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत लेखी उत्तर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना देण्यात आले आहे. त्यामुळे धनगर आरक्षणावरून सत्ताधारी नेत्यांकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचं सत्य समोर आले आहे.

याबाबत खासदार विशाल पाटील म्हणाले की, धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडून आलेला नाही. १९७९ साली धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली होती. त्यानंतर १९८१ साली केंद्र सरकारकडून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत बसू शकत नाही राज्याला कळवण्यात आले. त्यानंतर आजतागायत म्हणजे जवळपास ४३ वर्षात महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाबाबतीत कुठलाही प्रस्ताव अथवा पत्र दिले नाही असं लेखी उत्तर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाकडून मिळालं असल्याचं त्यांनी सांगितले.

धनगर आरक्षणाबाबत विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्‍यांकडून लेखी उत्तर मागितले होते. त्यावर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरीत तो केंद्र सरकारकडे पाठवावा. धनगर समाजाची मोठी मागणी आहे. त्याची दखल सरकारने घ्यावी. महाराष्ट्राचा खासदार म्हणून सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून मी याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करू. कुठल्याही समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याची शिफारस राज्य सरकारला करावी लागते त्यामुळे राज्याने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणीही खासदार विशाल पाटील यांनी केली.

एका रात्रीत परिपत्रक बदलण्याची नामुष्की

महाराष्ट्र राज्यातील महसूल व वने विभागाच्या १९९६ च्या अधिसूचनेमध्ये धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला होता. राज्यात ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हा वाद सुरू आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी‘धनगर ऐवजी धनगड वाचावे’ असे शुध्दीपत्रक महसूल विभागाने काढले होते. त्यावरून ज्या अधिकाऱ्याने हे शुद्धीपत्रक काढले त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी धनगर नेत्यांनी केली होती. धनगर समाजाच्या विरोधानंतर हे शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द केले होते. राज्यात धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करायला आदिवासी समाजाचा विरोध आहे. त्यात मागील २ निवडणुकीत धनगर समाजाने राज्यात आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र केला होता. त्यावेळी भाजपाने आमचे सरकार आल्यानंतर धनगरांना एसटीतून आरक्षण देऊ असं आश्वासन दिले होते. परंतु गेल्या १० वर्षात भाजपा शासन असतानाही असा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला नसल्याचं केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या उत्तरातून पुढे आले आहे. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणvishal patilविशाल पाटीलBJPभाजपा