शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 03:21 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. ३० नोव्हेंबरला रात्री राज्यपालांची सही झाली. रात्री प्रिंटिंग प्रेस सुरू ठेवली आणि शनिवारी सकाळी सहाच्या आत या आरक्षणाचे गॅझेट निघाले. आम्ही कच्च्या गुरूचे चेले नाही, अशा शब्दांत पालकमंत्री आणि आरक्षणविषयक नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा दोन दिवसांचा प्रवास शनिवारी उलगडला.मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून परिश्रम घेतलेल्या चंद्रकांत पाटील यांचे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास खास विमानाने विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर साडेचारच्या सुमारास त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.मिरवणुकीच्या समाप्तीवेळी ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये मंत्री पाटील म्हणाले, आमदार, मंत्री झाल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला शुक्रवारी झाला. १९६८ पासून अनेक चर्चा, बैठका, मोर्चे झाले; परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. ते आमच्या सरकारने दिले. यापुढील काळात धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजालाही कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षण देण्यात येईल. या आरक्षणामुळे एकीकडे मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत; तर दुसरीकडे शिक्षणाचे प्रमाणही वाढणार आहे.>मंत्री पाटील यांनी दिल्या घोषणाउघड्या जीपमध्ये बसल्यानंतर मंत्री पाटील यांनी हातामध्ये भाजपचा झेंडा घेऊन घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे भरते आले.>हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ वकिलांनी अभ्यास केला आहे. यातूनही काहीजण कोर्टात जाणार आहेत. त्यांना अंबाबाई सद्बुद्धी देवो! कुणाचेही काही काढून न घेता हे आरक्षण दिले आहे. तरीही आम्ही खूप तयारी केली आहे. मी सगळे पत्ते खुले करीत नाही.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील