शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:57 IST

फडणवीस यांची भाजपामधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले होते. 

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुकमध्ये फडणवीसांचं कौतुक करणारी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी फडणवीसांच्या ५५ व्या वाढदिवशी महाराष्ट्र नायक नावाचे एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले. त्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत आल्यास विचार करू असं म्हटले होते. त्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. फडणवीसांनीही आम्ही शत्रू नाही, वैचारिक विरोधक आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या कौतुकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, मी त्यांच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे. महाराष्ट्रात आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत. कुणीच कुणाचा शत्रू नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभार व्यक्त करतो. तर शरद पवारांचा मोठेपणा आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी माझ्याबद्दल विधान करणे हे माझ्यासाठी अतिशय मोलाचं आहे असं सांगत फडणवीसांनी शरद पवारांचेही आभार मानले आहेत. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे, शरद पवार?

फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसे काय नाकारता येईल? त्यांच्या कामाचा झपाटा उरक पाहिला की, मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो. आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. विविध विषयांची उत्तम जाण, प्रशासनावरील मजबूत पकड, आधुनिकतेची कास धरणारा नेता असं कौतुक शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले आहे. 

तर देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यांची समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. त्यांचा अभ्यासू स्वभाव, कायदेशीर आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची भाजपामधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले होते.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा