शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:25 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या तर ठाकरेंनी ९ जागांवर विजय संपादन केला. आता या दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं अशा भावना काही शिवसैनिकांनी बॅनरद्वारे व्यक्त केल्या आहेत. 

मुंबई - Sanjay Shirsat on Uddhav Thackeray ( Marathi News ) दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात या शिवसैनिकांच्या भावना आहे. ज्याला मंत्रिपद नको, आमदारकी, खासदारकी नको. कुठलेही पद नको त्या शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं सांगत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजधानी दिल्लीत काही शिवसैनिकांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेला एकत्रित येण्याचं आवाहन केले आहे त्यावर भाष्य केले.  

संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांनी बॅनर लावलेत त्यांना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी. आम्ही उठाव केला तर काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने पुढे जावेत ही त्या शिवसैनिकांची भावना आहे. त्याचा आम्हा सन्मान करतो. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कित्येकदा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून द्या सांगितले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारण खुर्चीची हाव होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीही खुर्ची घेऊ दिली नसती. सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली असती. खुर्चीसाठी कुणी तडजोड करायचं ठरवलं तर त्याला नाईलाज आहे. त्यामुळे आम्ही केलेला उठाव होता. आता आम्ही कितीही पाऊले पुढे टाकली तरी त्यांना वाटेल हे मजबूर झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही म्हणून पुन्हा धावपळ सुरू झाली म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्ही आहोत तिथे चांगल्या मजबूतीने उभे आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत असंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची कुठलीही मागणी नव्हती. जे मिळालं ते घेतले. मात्र इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्हाला दुसऱ्याचं वाकून पाहण्याची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही सत्तेबाहेर आहात, उगाच चर्चा घडवायची. बघा इतकं असून यांना काही मिळालं नाही. त्यामुळे आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पाहा असा टोला शिवसेनेने ठाकरे गटाला लगावला आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार व्हावा विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी आज बैठक होतेय. येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. काही आमदारांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जातील. मंत्रिमंडळ विस्तार हा करावा लागेल. ३ महिन्याचा कालावधी असला तरी मंत्रिमंडळ विस्तार करून कामांना गती येईल. विस्ताराबाबत वरिष्ठ नेते ठरवतील. विधानसभेला कुणी किती जागा लढवायच्या हे नेते ठरवतात. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत चर्चा केली. या चर्चा जाहीर येऊ नये त्यातून इतरांना आपल्यावर टीका करण्याची संधी मिळते असं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल