शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील अन् चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय; अजित पवारांचे बीडमध्ये वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:48 IST

अजित पवारांनी जाहीर भाषणात आपल्या काकांची आठवण काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

NCP Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. माझा सत्कार करू नका, शाल-श्रीफळ देऊ नका, कारण आई-वडील आणि चुलत्याच्या कृपने आमचं बरं चाललंय, असं अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांत निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जाहीर भाषणात आपल्या काकांची आठवण काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

युवा संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, "विकासकामांना निधी देण्याचं काम मी करेन. पण काम झाल्यानंतर ती गोष्ट सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. नाहीतर एखाद्या ठिकाणी थुंकणे, कचरा करणे असे प्रकार होता. आमच्यासारख्या नेतेमंडळींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. त्यावर कागद तसाच असतो.  काहीजण मोठा हार आणतात आणि त्याची पिशवी तशीच खाली ठेवतात. अशा खाली ठेवल्या जाणाऱ्या पिशव्या मी उचलायला सुरुवात केल्यानंतर काहीजण आता लाजंकाजं ते उचलायला लागले आहेत. पण असा सत्कार करण्याची काहीही गरज नाही. कर्मधर्म संयोगाने आणि आई-वडील, चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय," असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.

"सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालो, रिझल्ट दिला पाहिजे"

मला जनतेच्या आशीर्वादाने सहाव्यांदा उपमुख्यमंत्री संधी मिळाली असून या पदाच्या माध्यमातून लोकांना कामाचा रिझल्ट दिला पाहिजे, असंही यावेळी अजित पवार म्हणाले. "मी आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालो आहे. मला नाही वाटत परत कोणी 'माई का लाल' एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकतो. पण फक्त पद भेटून उपयोग नाही. त्या पदाच्या माध्यमातून रिझल्टही दिला पाहिजे. त्यामुळे मला काम करायचं आहे, मला कामाची आवड आहे," असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "आगामी काळात बीड जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी मी निधी देणार आहे. जिल्ह्यात विमानतळ, सायन्स सेंटर अशा नवनव्या गोष्टी येतील," असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड