वर्षानुवर्ष पुरुषसत्ताक व्यवस्थेतही एक स्त्री म्हणून निरनिराळ््या भूमिकांमध्ये ‘ती’ लढत असते. मात्र तरीही महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण व्हावे यासाठी वर्षातील एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण आयुष्य समाज, घर, व्यवस्थेशी झगडणाऱ्या या ‘ती’चा सन्मान करण्यासाठी एकच दिवस ‘महिला दिन’ का असावा? याविषयी ‘युवागिरी’टीमने आजच्या पिढीतील तरुणींची जाणून घेतलेली ही मते..वर्षानुवर्ष पुरुषसत्ताक व्यवस्थेतही एक स्त्री म्हणून निरनिराळ््या भूमिकांमध्ये ‘ती’ लढत असते. मात्र तरीही महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण व्हावे यासाठी वर्षातील एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण आयुष्य समाज, घर, व्यवस्थेशी झगडणाऱ्या या ‘ती’चा सन्मान करण्यासाठी एकच दिवस ‘महिला दिन’ का असावा? याविषयी ‘युवागिरी’टीमने आजच्या पिढीतील तरुणींची जाणून घेतलेली ही मते..
..मग ‘पुरुष दिन’ही साजरा करा!वर्षातील ३६५ दिवसांपैकी एकच दिवस ‘जागतिक महिला दिन’ साजरा करुन महिलांचे गुणगान गाण्यात काय अर्थ आहे? मग त्यापेक्षा विचारांमध्ये बदल घडवा. उगाचच महिला दिनाच्या नावाखाली जाहीर कार्यक्रम करण्यापेक्षा प्रत्येक पुरुषाने महिलांबद्दल आदर बाळगणे, तिचा सन्मान करण्याची कृती करावी. आणि मग केवळ महिला दिन का, ‘पुरुष दिन’ही साजरा करा.- कृतिका बागवे, सिद्धार्थ महाविद्यालयएकच दिवस कौतुक का?जागतिक महिला दिनाच्या आठवड्याभरापूर्वी पासूनच वेगवेगळ््या क्षेत्रातील यशस्वी महिलांबद्दल बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात समाजात अशा असंख्य तरुणी, महिला जगण्याशी संघर्ष करत आहेत. त्यामुळे महिला सक्षम आहेतच, मग केवळ एकच दिवस ‘महिला दिन’ साजरा करुन त्यांचे कौतुक करण्यापेक्षा प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा करावा. -शीतल कदम, एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयएकजुटीचे प्रतीक महिला दिन समाजाच्या सर्व स्तरांमध्ये यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या महिला आहेत. मात्र त्या कायम दुर्लक्षित असतात, त्यामुळे त्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी एकजुटीचे प्रतिक म्हणून महिला दिन साजरा करायला पाहिजे. जेणेकरुन, पुरुषसत्ताक व्यवस्थेत तरुणी-महिला एकत्र आहेत हे सर्वांना कळले पाहिजे.- हर्षदा गजुला, खालसा महाविद्यालयगरज समाज सक्षमीकरणाची!महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण घडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पातळीवर ‘महिला दिन’ साजरा केला जातो. मात्र खरेतर, महिला सक्षमीकरणाऐवजी समाज सक्षमीकरणाची गरज आहे. त्यामुळे महिला दिन साजरा करुन महिला-तरुणींना त्या दुबळे असण्याची जाणीव करुन देण्यापेक्षा समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. - सायली पाटील, एमडी महाविद्यालय एकच दिवस का? पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतात. महिलांनी प्रगती केली, ही वाक्ये सर्रास वापरली जातात. महिलांचा सन्मान करण्यासाठी एकच एक दिवस कशाला हवा? प्रत्येक महिला ही कणखरच असते. महिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वांना सांभाळते आणि त्याचबरोबरीने पुरूषालाही पाठिंबा देत असते. महिलांचा विचार करताना एकाच एक दिवस साजरा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सर्वच दिवस महिलांना समान वागणूक दिली पाहिजे. - अदिश्री सहस्त्रबुद्धे, सोमय्या महाविद्यालयसेलिब्रेशनसाठी महिला दिनमहिलांना एक दिवस सेलिब्रेशन करायला मिळणार असेल, तर नक्कीच महिला दिन साजरा करावा. पण, महिलांसाठी एक दिवस देतो आहे, या भावनेने हा दिन साजरा करणे पटत नाही. प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा असतो. एखादा दिवस साजरा करण्यामागे काही गोड आठवणी किंवा विशेष असे काहीतरी असते. असा विचार केल्यास प्रत्येक महिलेचा स्वत:चा दिवस हा वेगळा असणार हे नक्की. - नेहा सोहनी, साठ्ये महाविद्यालय