शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या NDA प्रवेशाचा मार्ग आणखी सुकर; डिफेन्स करिअर ॲकॅडमीचा स्पेशल क्रॅश कोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 08:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीए-एनएआयआय- २०२१ परीक्षेसाठी मुलीदेखील पात्र असणार आहेत.

औरंगाबाद : भारतीय सैनिकी सेवेत प्रवेश करून अभिमानास्पद करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी पुण्यातील एनडीए या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेशाचा मार्ग आता खुला झाला आहे. येत्या १४ नोव्हेंबरला यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेत मुली यशस्वी व्हाव्यात यासाठी डिफेन्स करिअर ॲकॅडमीने (डीसीए) युवक-युवतींसाठी ऑनलाइन स्पेशल क्रॅश कोर्स सुरू केला आहे. ९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत तज्ज्ञ प्रशिक्षकांचे सखोल मार्गदर्शन, परिपूर्ण अभ्यास व सर्वांगीण तयारीच्या दृष्टीने या क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी dcaaurangabad.org या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन डीसीएचे संचालक प्रा. केदार रहाणे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीए-एनएआयआय- २०२१ परीक्षेसाठी मुलीदेखील पात्र असणार आहेत. १२ वी उत्तीर्ण झालेल्या आणि १२ वीत शिकत असलेल्या मुलींसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. यामध्ये आर्मी विंगसाठी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण किंवा शिक्षण घेत असलेली उमेदवार, वायुसेना आणि नौदल विंग तसेच इंडियन नेव्हल ॲकॅडमीसाठी विज्ञान शाखेत फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषयांसह बारावी उत्तीर्ण किंवा शिक्षण घेत असलेल्या उमेदवार पात्र असतील. त्यामुळे एनडीए प्रवेशासाठी असलेल्या या माेठ्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.