शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 10:46 IST

लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

लोणावळा, दि. 30 - लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पाऊस थांबल्याने परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून नागरिकांना काहिसा सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या वळवण धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे ऐन गणेशोत्सवात वळवण, वरसोली, मळवली, जवळकरवस्ती, खत्री फार्म या भागासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुराचा तडाखा बसणार अशी साधारण शक्यता निर्माण झालेली असताना पावसाने घेतलेली विश्रांती सर्वांकरिता दिलासादायक ठरली आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते बंद झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मंगळवारी सायंकाळ बंद करण्यात आली होती. ती रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली. वलवण धरणातून डक्ट लाईनच्या माध्यमातून शक्य तेवढे पाणी खोपोली भागात सोडत धरणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न टाटा कंपनी प्रशासनाकडून सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराच्या काही भागाला पूर्ण विळखा बसू शकतो, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण मात्र सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

मावळात ढगफुटी होण्याची अफवा मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मावळ तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे संदेश मंगळवारी रात्रभर सोशल मीडियावरुन वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पवना धरणाचा विसर्ग वाढविला पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत राहिल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता धरणातून 7 हजार 500 क्युसेक्सने पाणी पवना नदीत सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला तर बेबेडोअळ पुलाला पाणी लागले आहे. मावळातील वाडीवळे धरणातून 4 हजार 600, कासारसाई धरणातून 300 तर आंद्रा धरणातून 1 हजार 150 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने ग्रामीण भागातील व विशेषतः नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. तसेच आपतकालिन स्थितीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.