शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

By admin | Updated: May 21, 2016 02:18 IST

पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़

मुंबई : नालेसफाईवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़ तसेच पाणी तुंबण्याची संवेदनशील ठिकाणेही ४० वरून तीनवर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़नालेसफाईच्या कामावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे़ विरोधकांनी पोलखोल करण्याचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनालाच जबाबदार धरून आपला बचाव केला आहे़ नालेसफाईवरून चर्चेचा गाळ उडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने आज मौन सोडून आपली बाजू पत्रकार परिषदेतून मांडली़मुंबईत या वर्षी एक महिन्याआधीच म्हणजे १५ मार्च रोजी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे़ त्यानुसार आतापर्यंत मुख्य नाल्यांमधील ६६ टक्के तर वॉर्डमार्फत सुरू असलेल्या छोट्या नाल्यांची सफाई ३५ टक्के झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला़ >पाणी तुंबण्याची ठिकाणे अवघी तीनपावसाळ्यात मुंबईत ४० ठिकाणी हमखास पाणी साचत होते़ या ठिकाणांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता केवळ हिंदमाता, सायन रोड क्ऱ २४ आणि नायर रुग्णालयाचे प्रवेशद्वार येथेच पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला़हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी बांधलेले ब्रिटानिया पंपिंग स्टेशन ३१ मेपासून कार्यान्वित होणार आहे़मुंबईत पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९३ पंप लावण्यात येणार आहेत़>पाणी तुंबणार, मात्र १५ मिनिटेचताशी २५ मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि़मी़पर्यंत वाढविण्यात आली आहे़ त्यापुढे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढू शकत नाही़ मात्र मोठ्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी तुंबले तरी ते १५ ते २० मिनिटेच तुंबेल, असा दावा देशमुख यांनी केला आहे़>छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळाछोट्या नाल्यांच्या सफाईसाठी मागविलेली निविदा ३०० टक्के जादा दराने आल्या होत्या़ दुसऱ्या वेळीच दोनशे आणि त्यानंतर ८० टक्के जादा दराच्या निविदा आल्यामुळे अखेर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विभागस्तरावरच कामगारांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली़ यामुळेच आतापर्यंत ३५ टक्केच नाले साफ झाले आहेत़गाळ टाकण्यासाठी पालिकेची जागानाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने गेली तीन ते चार वर्षे पालिकेची मोठी अडचण निर्माण झाली होती़ मुंबईशेजारील गावांमध्येही पालिकेने जागा देण्याची विनंती केली़ मात्र अन्य महापालिकांनी नकारघंटाच वाजवली़ त्यामुळे ठेकेदारांनाच गाळ टाकण्याची जागा शोधण्यास बंधनकारक करण्यात आले होते़ यामुळेच घोटाळा करण्याची संधी ठेकेदारांना मिळाली़ बनावट प्रमाणपत्र दाखवून गाळ मुंबईबाहेर नेल्याचे ठेकेदार भासवत होते़ त्यामुळे पालिकेने या वर्षी नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यात नऊ डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली आहे़