मुंबई : महापालिकेकडून ४ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कुर्ला येथील शिवसृष्टी मार्गावरील कॉसमॉस सोसायटी येथे तानसा जलजोडणीसह विहार जलजोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, या काळात नेहरूनगर, क्रांतिनगर, शिवसृष्टी, चुनाभट्टी, व्ही.एन. पुरव मार्ग, कामगार नगर, मदर डेअरी मार्ग, एव्हरार्ड नगर, कसाईवाडा, कुरेशी नगर, उमरवाडी, साबळे नगर, कुर्ला टर्मिनस, नवीन टिळक नगर, भक्ती पार्क, प्रतीक्षा नगर येथे पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे. तसेच पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
कुर्ल्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: August 2, 2016 02:06 IST