शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नागरिकांना मागणीपेक्षा जास्त पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:40 IST

पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनासाठी १८ ठेकेदारांची नियुक्ती केली असून त्यांनी व्यवस्थित काम केले नाही तर कारवाई करण्याची तरतूद आहे. नागरिकांच्या तक्रारीची २४ तासात दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याविषयी करण्यात आलेल्या व भविष्यातील उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती प्रसारित केली आहे. शहरातील एकूण लोकसंख्या १४ लाख ४७९२ गृहीत धरून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिमाणसी १५० लिटर प्रमाणे २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात ३३० एमएलडी पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी शहरामध्ये विभागनिहाय १८ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांवर पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी पाणीगळती, पंपिंग मशिनरी, दुरूस्ती, ग्राहकांच्या तक्रारी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्या वेळेत सोडविण्याची जबाबदारी ठेकेदारांवरच आहे. पाणी व ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात येते. जलवितरण व्यवस्था, दैनंदिन सफाई, जलमापक नोंदी घेणे, पाणी नमुने तपासणी, क्लोरीन मात्रा तपासणे, झोनमधील विहिरींची व कूपनलिकांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या कामांसाठी सुशिक्षित व अनुभवी कर्मचारी नियुक्ती करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. ठेकेदारांनी नियमाप्रमाणे कामे केली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनउर्त्थान कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्राहकांना जलमापक बसविण्यात आले आहेत. १५ मि. मी. व्यासाच्यावरील घरगुती, वाणिज्य वापराच्या नळ जोडण्यांना एएमआर सुविधेसह जलमापक संबंधित ग्राहकांनी स्वत: बसवायचे आहेत. शहरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत १०२७७ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय १४ उच्चस्तरीय जलकुंभामध्ये पंपिंगद्वारे पाणी न घेता पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पालिकेचे ४८ लाख रूपये वीज देयकाची बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील ५७ टक्के परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. >जादा पाणी कुठे मुरते? शहरात रोज २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात ३३० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. मागणीपेक्षा तब्बल ६१ एमएलडी जादा पाणी दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात नागरिकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असताना मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.