शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ८५० गावांत पाणीटंचाई; कमी पावसाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:45 IST

यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

अमरावती : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. यासाठी एक हजार ३९३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान ३० कोटी ४६ लाखांचा खर्च केल्या जाणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.शासनाद्वारा दुष्काळी तालुक्याची घोषणा केल्यानंतर या गावांत पाणीटंचाईच्या उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावर नियोजन सुरू आहे. यामध्ये पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यातील संयुक्त कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात डिसेंबरपर्यत २९३ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार आहे. यासाठी तीन कोटी ९७ लाख रूपये खर्चाच्या ३७५ उपाययोजना केल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यात याच कालावधीत १३६ गावांमध्ये ४ कोटी ७० लाख रूपये खर्च करून २०१ उपाययोजना केल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४२१ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे. यासाठी ८९७ उपाययोजना केल्या जाणार आहे. यावर किमान २१ कोटी ९० लाख ५७ हजारांचा खर्च केल्या जाणार आहे. विभागात यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात मात्र, डिसेंबरपर्यंत पाणीटंचाईची धग नाही. मात्र, जानेवारी पश्चात उंच भागावरील काही गावांमध्ये पाणीटंचाई जानवणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.विभागात ३५ तालुक्यांतील भूजलात घटअमरावती विभागात सरासरीपेक्षा १५ टक्कयांनी पाऊस कमी झाला. मात्र, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे विभागातील ५६ पैकी ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत कमी आलेली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १२ तालुके, अकोला ७, वाशिम १, बुलडाणा १३ व यवतमाळ जिल्ह्यात २ तालुक्यांचा समावेश आहे. याउलट यवतमाळ जिल्ह्यातील १४ व वाशिम जिल्ह्यातील ५ तालुक्यातील भूजलाची पातळी वाढली आहे.रबी हंगामालाही फटकासरासरीपेक्षा कमी पाऊस व परतीचा पाऊस नसल्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. त्यामुळे विभागातील अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील रबी हंगाम धोक्यात आलेला आहे. प्रकल्प साठा निम्म्यावर आला असल्याने रबीला सिंचनासाठी पाण्याची पाळी मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदा सहा लाख ४६ हजार ७०० हेक्टरमध्ये रबी प्रस्तावित असला तरी किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगीतले.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती