शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शहापूरवासीयांची दिंडी

By admin | Updated: May 18, 2016 05:02 IST

उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, संतप्त झालेले शहापूरवासीय मंगळवारी जलदिंडी घेऊन आझाद मैदानावर धडकले. मुंबई महानगरपालिकेने शहापूर तालुका दत्तक घेऊन टँकरमुक्त करावा, अशी त्यांची मागणी होती.महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी डोक्यावर कळशी घेऊन पदयात्रा स्वरूपात शनिवारी ही दिंडी शहापूरहून निघाली होती. सोमवारी रात्री मुंबई शहरात पोहचलेली दिंडी मंगळवारी राणीबागहून जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानावर धडकली. या ठिकाणी जलदिंडीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.जलदिंडीचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा या तीन प्रमुख धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. तानसा आणि वैतरणा धरणांतून मुंबईकरांना प्रतिदिन प्रत्येकी ४५५ दशलक्ष लीटरप्रमाणे ९१० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शिवाय एकट्या भातसा धरणातून सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन २ हजार ५० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. म्हणजेच मुंबईकरांना प्रतिदिन २ हजार ९६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. >...तर शहापूरची वर्षभराची तहान भागेलशहापूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या अहवालानुसार, शहापूर तालुक्यातील शहरी भागाला प्रतिदिन ४९ लाख ४९ हजार ७०० लीटर आणि ग्रामीण भागाला ९७ लाख ३५ हजार ७२० लीटर म्हणजेच एकूण १७.६२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार संपूर्ण शहापूरला प्रतिवर्ष ६ हजार ४३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार मुंबईला लागणाऱ्या एका दिवसाचा पाणीपुरवठा शहापूर तालुक्याला केल्यास शहापूरवासीयांची संपूर्ण वर्षाची तहान भागेल.>मुख्यमंत्री प्रश्न सोडवणारजलदिंडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चेत शहापूरचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती जलदिंडीचे संयोजक संतोश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.