शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पाण्याचा केमिकल लोचा !

By admin | Updated: October 9, 2014 01:06 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन

बुटीबोरीचे पाणी पिण्यास अयोग्यविहंग सालगट - नागपूर बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन व कठोर धातूमिश्रित पाणी पित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हे कटू सत्य जाणून घेण्यासाठी लोकमत चमू बुटीबोरी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली. येथील लोकांनी सांगितलेली माहिती गंभीर आहे. थेट वेणा नदीत पाईपलाईन टाकून या क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीत औद्योगिक क्षेत्रातील घाण आणि रसायनयुक्त पाणी सोडले जाते. एकच जलस्रोत असल्याने पाईपलाईनद्वारे आलेले पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर पर्याय नाही. या पाण्याला फिल्टर का करण्यात येत नाही, ही बाब ग्रामपंचायतकडून जाणून घेण्याचा प्रयत्न चमूने केला. पण नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले की, फिल्ट्रेशनचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे. दोन वर्षांआधी काम सुरू झाले, पण ते कासवगतीने सुरू आहे. या कामावर ७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुमारे २३ वर्ग कि.मी.मध्ये आहे. त्यापैकी १४.९५ वर्ग कि़मी. क्षेत्राचा सर्वाधिक विकास झाला आहे. राज्यातील पहिला फूड पार्क या वसाहतीत असल्याचा शासनाचा दावा आहे. ११० कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू आहे आणि १४ कारखान्यांचे काम प्रगतिपथावर आहे. एवढे सगळे असताना या क्षेत्राच्या विकासात काय उणिवा राहिल्या असतील, हा प्रश्न तारांकित आहे. विकिपीडिया (इनसायक्लोपीडिया) यावर बुटीबोरीसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार जगाच्या औद्योगिक पटलावर या क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज का भासत असेल? बुटीबोरी ग्रामपंचायतची भूमिका काय? येथील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा आदी समस्यांवर लोकमत चमूने या क्षेत्राचे अवलोकन केले. त्याची माहिती आम्ही वेगवेगळ्या भागात प्रकाशित करीत आहोत. तपासणीत पाणी रसायन मिश्रितबुटीबोरी ग्रामपंचायत, नागपूरच्या रिजनल पब्लिक हेल्थ लेबॉरेटरीजमध्ये वर्षातून दोनदा पिण्याच्या पाण्याचे केमिकल परीक्षण करते. पाण्यात रसायन आणि कठोर धातूंचे मिश्रण मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल रिसर्च लॅबने ग्रामपंचायतला दिला आहे. हे पाणी पिल्याने किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम पडू शकतो, असे चिकित्सकांनी सांगितले.