शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या 18 दरवाजांतून सोडले पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 23:52 IST

जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.  धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले

पैठण, दि. 21 - जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले असून, धरणातून दहा हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दरवाजा क्र. १० ते २७ या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. यावेळी जायकवाडीचे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोडे, तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक गिरी,  नगर परिषद मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, आर. ई. चक्रे, माजी नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे,  नामदेव खरात, पवन लोहिया, शाम लोहिया, भिकाजी आठवले आदी उपस्थित होते.जायकवाडी धरणातून यापूर्वी २००८ मध्ये सकाळी ११ वाजता १ लाख क्युसेक्सने पाणी सोडले होते. हे पाणी गोदावरी नदीपात्राबाहेर न गेल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. परंतु २००६ मध्ये अडीच लाख क्युसेक्सने पाणी सोडले, तेव्हा ७० टक्के पैठण शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय १५ गावांतही पाणी घुसले होते.